मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर… खडसे… घरातीलच गोष्ट आहे; गिरीश महाजन आक्रमक, थेट दिलं आव्हान

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केल आहेत. महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत, असा दावा खडसे यांनी एका पत्रकाराच्या हवाल्याने केला आहे.  त्यांच्या या आरोपानंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, आता खडसेंच्या या आरोपांवर महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंनी एक पुरावा द्यावा, मी राजकारण सोडेन, असं आव्हान महाजन यांनी खडसेंना दिलंय.

..तर मी कोणालाही तोंड दाखवणार नाही

मी एकनाथ खडसे यांची एक गोष्ट सांगितली तर ते बाहेर निघाले तरी लोक त्यांना जोड्याने मारतील. मी अजूनही त्यांना आव्हान देतो. त्यांनी फक्त एक पुरावा दाखवावा, मी सक्रीय राजकारणातून बाहेर पडतो. मी कधीच कोणाला तोंड दाखवणार नाही. त्यांनी पुवावे लोकांना दाखवावेत. त्यांनी नुसतं बडबड करू नये. यांना पुरावे दिले, त्याला पुरावे दिले, असे करू नये, असे थेट आव्हानच गिरीश महाजन यांनी खडसे यांना दिले.

…तर तोंड काळं करूनच बाहेर पडावं लागेल

तसेच, खोटं बोलताना लाज वाटत नाही. माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की, त्यांनी एक पुरावा दाखवावा. माझा आता त्यांनी अंत पाहू नये. मी एका गोष्टीचा खुलासा केला, तर तोंड काळं करूनच बाहेर पडावं लागेल. घरातलीच गोष्ट आहे. पण मी ती बोलणार नाही, अशा थेट इशाहारी महाजन यांनी खडसे यांना दिलाय. मला बोलयला लावू नका. खडसे यांनी एका भोंदू पत्रकाराला सांगून हा विषय उचलायला लावला. त्यातूनच हे सगळं समोर आलं आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

खडसे यांनी महाजन यांच्यावर काय आरोप केले?

एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. महाजन आणि एक महिला आयएएस अधिकारी यांच्यात संबंध आहेत. याची कल्पना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनादेखील आहे. एका पत्रकाराच्या हवाल्याने त्यांनी हा दावा केला आहे. विशेष म्हणजे अमित शाहा आणि माझी कधी भेट झालीच तर मी महाजन यांच्यावरील या आरोपांबाबत विचारणार आहे, असंही त्यांनी सांगितलंय. खडसे यांच्या आरोपांनंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

संजय शिरसाट यांनी केली महाजनांची पाठराखण

दरम्यान, खडसे यांनी महाजन यांच्यावर आरोप केल्यानंतर शिंदे गटाचे नेते तता मंत्री संजय शिरसाट यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गिरीश महाजन यांची पाठराखण केली आहे. महाजन यांच्याविरोधात नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पूर्ण चौकशी करूनच त्यांना मंत्रिपद देण्यात आलंय, असं शिरसाट म्हणाले आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)