कळंबोलीमध्येHighway Heroes Campaign चा दुसरा दिवस, शेकडो ट्रक ड्रायव्हर्स उत्साहात सहभागी

हायवे हिरोज कॅम्पेनImage Credit source: TV9 bharatvasrh

महाराष्ट्रातील कळंबोली येथे सुरू असलेल्या जाणाऱ्या टीव्ही9 नेटवर्क आणि श्रीराम फायनान्सच्या हायवे हिरोज कॅम्पेनच्या दुसऱ्या दिवशी उत्साह आणि जोश दिसून आला. या विशेष मोहिमेत शेकडो ट्रक चालकांनी भाग घेतला आणि ती यशस्वी केली. दुसऱ्या दिवशीही, ट्रक चालकांसाठी भारत सरकारद्वारे प्रमाणित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जिथे चालकांना रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम, प्रथमोपचार आणि CMVR बद्दल माहिती देण्यात आली. लांब प्रवासात स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता कशी सुनिश्चित करावी हे तज्ञांनी त्यांना सांगितले.

स्किल इंडिया अंतर्गत या प्रशिक्षण कार्यक्रमानंतर, त्यांना भारत सरकारने मान्यताप्राप्त सर्टिफिकेट देण्यात आले, जे 12+ च्या समान आहे. तसेच, या प्रमाणपत्राद्वारे, भारतासह 90 देशांमध्ये चालकांना त्याचे फायदे मिळू शकतात. याशिवाय, चालकांनी मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी संबंधित सत्रांमध्ये भाग घेतला. त्यांना तणाव व्यवस्थापन आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्याच्या पद्धतींबद्दल देखील सांगण्यात आले.

सायबर फ्रॉडपासून कसे वाचावे ?

Piramal Swasthya च्या डॉ. सूरज यांनी चालकांना टीबी आजाराची लक्षणे, प्रतिबंध आणि उपचारांबद्दल माहिती दिली. ट्रक चालकांना हा आजार सहज का होऊ शकतो आणि वेळेवर निदान आणि उपचार का आवश्यक आहेत हे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर मकसूद मेमन यांनी आर्थिक समज आणि सायबर फ्रॉडपासून बचाव, संरक्षण यावर एक सेशल घेतले. आपले पैसे कसे वाचवू शकतो, हे त्यांनी समजावलं. ऑनलाइन फसवणूक कशी टाळायची आणि खर्चाचे योग्य व्यवस्थापन कसे करायचे, हे त्यांनी स्पष्ट केलं.

फ्री हेल्थ चेकअप कँप

त्यानंतर विनय झेंडे आणि निशा यादव यांनी चालकांना सोपी योगासने आणि इतर व्यायाम शिकवले. प्रवासात असतानाही ते आरामात करू शकतील अशी ही योगासने असून त्यामुळे थकवा कमी होईल आणि शरीर सक्रिय राहील. अपोलो हेल्थकेअरच्या टीमने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन देखील केले. त्यावेळी ब्लड शुगर, ब्लड प्रेशर आणि डोळ्यांची तपासणी करण्यात आली.

ड्रायव्हर्सनी या सुविधेचा फायदा घेतला आणि अनेक लोकांनी पहिल्यांदाच त्यांची आरोग्य तपासणी केली. Highway Heroes Campaign या कॅम्पेनचा दुसरा दिवस देखील ट्रक चालकांसाठी माहिती, आरोग्य आणि प्रोत्साहनाने भरलेला होता. ही मोहीम त्यांना केवळ चांगले ड्रायव्हर बनवत नाही तर त्यांना जागरूक आणि निरोगी देखील बनवेल.

पुढचा टप्पा गांधीधाम

टीव्ही9 नेटवर्क आणि श्रीराम फायनॅन्सच्या Highway Heroes Campaign चा पुढला टप्पा हा गांधीधाम येथे आहे. 25 आणि 26 एप्रिलला हायवे हिरोज कॅम्पेन नवीन उत्साहाने आपला प्रवास सुरू करणार आहे. यानंतर, हे कॅम्पेन इंदूर, बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद येथे पोहोचेल, जिथे ट्रक चालकांसाठी अशीच सत्रे आयोजित करण्यात येणार आहे. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल व्हावा हा त्याचा उद्देश आहे. ट्रक चालकांचे तांत्रिक ज्ञान वाढवण्यासह त्यांचे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न या कॅम्पेनद्वारे करण्यात येत आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)