हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका जास्त, कशी घ्याल काळजी?

Winters Health Tips : हिवाळा सुरु झाला असून थंडी वाढली आहे. जेव्हा तापमान कमी होऊ लागतं तेव्हा अनेक आजारांचा धोका वाढतो. पण, सर्वात जास्त धोका हृदयविकाराचा म्हणजेच हार्ट अटॅकचा असतो. हिवाळ्यात याची भीती अधिक असते. आता हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका का येतो? हे कसं टाळता येईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या.

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अभ्यासानुसार, हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्याची प्रकरणं 30 टक्क्यांनी वाढतात. भारतातही दरवर्षी हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण अधिक दिसून येते. एम्स दिल्लीच्या संशोधनानुसार देशात हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्याच्या घटनांमध्ये 25 टक्क्यांपर्यंत वाढ होते.

तापमानातील बदल, खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे या ऋतूत हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तुम्हाला माहिती आहे की, पूर्वी हृदयविकाराचा आजार वृद्धांमध्ये जास्त दिसून येत होता. परंतु आता लोक लहान वयातच हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहेत.

हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका का येतो?

हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका का वाढतो? राजीव गांधी रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. अजित जैन सांगतात की, हिवाळ्यात थंड तापमानामुळे हृदयाच्या नसांना रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही, ज्यामुळे बीपी वाढतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

प्रदूषणामुळे ह्रदयविकाराचा धोका

राजीव गांधी रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. अजित जैन सांगतात की, हिवाळ्यात थंडी आणि वायू प्रदूषण या दोन्हींमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. हिवाळ्यात वायू प्रदूषणही जास्त असते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, कारण प्रदूषणाचे कण श्वासाद्वारे फुफ्फुसात जातात. हे कण रक्तातही जमा होतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात. ज्यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. यामुळे हृदयावर दबाव येतो आणि यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

हृदयविकाराचा झटका कुणाला अधिक?

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांना उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह किंवा लठ्ठपणाची समस्या आहे. त्यांना हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. अशा वेळी या लोकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. दरम्यान, ह्रदयरोगाची लक्षणे काय, याविषयी जाणून घेऊया.

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे कोणती?

  • छातीत वेदना किंवा दबाव
  • डावा हात किंवा हात दुखणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • चक्कर येणे
  • मळमळ आणि उलट्या
  • छातीत जडपणा जाणवणे

हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका कसा टाळावा?

  • फळे, भाज्यांचा समावेश असलेला निरोगी आहार घ्या
  • सकाळ आणि संध्याकाळच्या कमी तापमानात व्यायाम करणे टाळा
  • धूम्रपान करू नका
  • अल्कोहोलचे सेवन करू नका
  • कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी करून घ्या
  • अ‍ॅस्पिरिनसारखी औषधे सोबत ठेवा
  • उबदार कपडे घाला
  • फास्ट फूड टाळा
  • नियमितपणे आपला बीपी तपासत रहा
(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)