गडावर कोणालाही बोलवा. माझी हरकत नाही. गडाच्या विकासासाठी मी सदैव तयार आहे. जोपर्यंत लोक सांगतील तोपर्यंत मी काम करणार आहे. लोकांनी नाही म्हटल्यावर मी घरच्या गादीवर बसले. आपले तत्व आपल्यासाठी आदर्श असतो. मी गुंडांसाठी गुंड, कोणालाही घाबरत नाही, असे राज्याच्या पर्यटन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
शिक्षकांसाठी ऑनलाईन बदलीचा निर्णय
शिक्षकांची पिळवणूक होत होती. १५ वर्षांपासून काही शिक्षक एकाच ठिकाणी होते. पती-पत्नी वेगवेगळ्या जिल्ह्यात होते. त्यांच्या बदल्या होत नव्हत्या. बदल्यांसाठी त्यांनी पैसा दिल्याशिवाय त्यांच्या बदल्या होत नव्हत्या. तो प्रकार माझ्या लक्षात आला. त्यानंतर ऑनलाईन बदलीचा निर्णय मी घेतला. मी कुणाची मिंदी नाही. मी गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे. जो पर्यंत लोक सांगतील मी काम करणार आहे. जनता जेव्हा नाही म्हणतील तेव्हा मी घरी बसेन, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
ऊस तोड कामगारांचे कष्ट मी करणार आहे. प्रत्येक ऊस तोड कामगारांच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करणार आहे. मी जालन्याची पालकमंत्री असली तर माझे लक्ष माझ्या मायभूमीकडे बारीक लक्ष असणार आहे. मी जालन्याची पालकमंत्री असली तरी माझ्या जन्मभूमीकडे माझे लक्ष राहणार आहे. बीडमध्ये अजित दादा पालकमंत्री आहेत. मी मंत्री आहे. दादांना शिस्तीत काम करून दाखवावे लागेल. दादा अर्थमंत्री आहेत.
लाडक्या बहिणींचे प्रेम वाढले
लाडकी बहीण योजना सुरु झाल्यावर माझ्यावर प्रेम करणारे अधिक वाढले. त्यापूर्वी प्रेम करत होत्या. परंतु या योजनेनंतर ते प्रेम अधिक वाढले आहे. तुम्ही माझ्या लडकी बहिणी आहेत. मी तुमची लडकी बहीण आहे. १८२५ दिवस सत्तेची माझ्याकडे आहे. त्यातील २२५ दिवस असेच जातील. उरलेल्या १६०० दिवसांत प्रत्येक दिवस मी विकास देईल. आता मी तसा निधी देऊ शकत नाही. कारण मी पर्यावरण मंत्री आहे. पशूसंवर्धन मंत्री आहे. परंतु आता संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
मी गडावर अनेक वर्षांपासून येत आहे. बाबांबरोबर या गडावर येत होते. तेव्हापासून अपवाद वगळता मी या गडावर आले. राजकारणात काम करणाऱ्यांनी धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्मात काम करणाऱ्यांनी राजकारणात येऊ नये. त्यांना धर्मात येयाचे असेल तर त्यांनी वैराग्य धारण केले पाहिजे. भगवान बाबा यांच्या संदर्भात माझ्या मनात काय आहे? हे मी सांगू शकत नाही. ते माझ्यासोबत सदैव असतात. मी मंत्री आमदार, खासदार, नसताना जनतेने प्रेम दिले, असे पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.