उन्हाळ्यात दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा? ‘या’ 8 टिप्स करा फॉलो

उन्हाळ्यात त्वचेच्या सर्वाधिक समस्या निर्माण होत असतात. कारण गरमीच्या या दिवसांमध्ये तेलकट त्वचा असलेल्या लोकांना जास्त समस्यांना तोंड द्यावे लागते कारण घाम, धूळ आणि घाण यामुळे त्वचे आणखी चिकट होते, अशाने त्वचेवरील उघड्या छिद्रांवर धूळ आणि घाण चिकटल्याने मुरुम आणि पुरूळांची समस्या वाढते. तीव्र सूर्यप्रकाशात त्वचा टॅन देखील होते. उन्हाळ्यात तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही चेहरा धुताना या टिप्सचे पालन केले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात…

चेहरा धुण्याचे सोपे नियम:

उन्हाळ्यात गरम पाण्याने चेहरा स्वच्छ करणे टाळा. तर उन्हाळ्यात तुम्ही कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ केल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ करा. कोमट पाणी तुमच्या चेहऱ्यावरील घाण, तेल आणि मेकअप काढून टाकण्यास मदत करते.

चेहरा स्वच्छ करण्यापूर्वी मेकअप काढा. मेकअपचा एकही कण त्वचेवर राहणार नाही याची खात्री करा, अन्यथा तो छिद्रांमध्ये जाऊ शकतो आणि तुम्हाला मुरुमांची समस्या होऊ शकते.

चेहरा स्वच्छ करण्यासाठी सौम्य क्लींजर वापरा. कठोर क्लींजर्स त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. अशाने त्वचेची जळजळ होऊ शकते.

दिवसातून दोनदा पाण्याने चेहरा स्वच्छ करा. सकाळी आणि संध्याकाळी चेहरा स्वच्छ केल्याशिवाय झोपू नका. मेकअप न काढता चेहरा धुतल्यास तुम्हाला मुरुमे, पुरळ सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

चेहरा साफ करताना दुसऱ्याचा टॉवेल कधीही वापरू नका. चेहरा साफ करताना नेहमी स्वच्छ टॉवेल वापरा. कारण अशाने तुम्ही इतरांचा टॉवेल वापरल्यास त्वचा स्वच्छ होण्याऐवजी बॅक्टेरिया पुन्हा चेहऱ्यावर येऊ शकतात. दुसऱ्याच्या टॉवेलचा वापर केल्याने त्वचेचा संसर्ग होऊ शकतो.

चेहरा स्वच्छ केल्यानंतर, त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावा. यामुळे कोरड्या त्वचेची समस्याही दूर होईल.

चेहरा स्वच्छ केल्यानंतर चांगल्या दर्जाचे सनस्क्रीन लावणे देखील महत्त्वाचे आहे. विशेषतः जेव्हा तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात भर दुपारी घराबाहेर पडत असाल. सकाळी घराबाहेर पडताच सनस्क्रीन लावा. सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचा खराब होऊ नये आणि टॅन होऊ नये म्हणून कमीत कमी SPF 30 असलेले सनस्क्रीन वापरा.

वारंवार तोंडाला हात लावू नका. हात अनेक कामे करतात आणि अनेक गोष्टींना स्पर्श करत राहतात, ज्यामुळे धूळ, घाण आणि बॅक्टेरिया त्यांच्यावर चिकटतात. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर हातांनी वारंवार त्वचेला स्पर्श करणे टाळा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)