What should be the distance between the refrigerator and the wallImage Credit source: Meta AI
आजच्या काळात घरात सर्वात महत्त्वाची असणारी उपकरणे म्हणजे फ्रिज, टीव्ही, ओव्हन ज्याच्या त्याच्या गरजेनुसार लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू. त्यांची जशी आपल्याला गरज असते तशीच त्यांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. तर ते नक्कीच चांगलीच सर्वीस देतात. आणि बराच काळ टिकतात. त्यातील एक महत्त्वाचं उपकरण म्हणजे फ्रिज जो कि जवळपास प्रत्येक घरात असतोच असतो. भाज्या ठेवण्यापासून ते थंडगार पाणी पिण्यापर्यंत सगळ्यासाठीच उपयुक्त फ्रिज हा लागतोच.
फ्रिज भिंतीपासून अंतरावर असणे का गरजेच?
फ्रिज साफ ठेवणे जेवढे गरजेचं असतं सोबतच अजून एक गोष्ट माहित असणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. ती एक गोष्ट म्हणजे फ्रिज आणि भिंतीमध्ये अंतर असणे. फ्रिज आणि भिंतीमध्ये एक अंतर ठेवणे गरजेचं असतं. पण ते किती असावं? आणि त्याचे फायदे काय ते जाणून घेऊयात.
फ्रिज भिंतीला चिटकून ठेवला तर काय होतं?
फ्रिज भिंतीला चिटकून ठेवणे योग्य नसून त्यात काही अंतर सोडणे आवश्यक असते कारण त्या अंतरामुळे रेफ्रिजरेटर स्वतःला थंड करणे शक्य होते. रेफ्रिजरेटरला आतील भाग थंड ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. या प्रक्रियेदरम्यान मागील ग्रिलमधून उष्णता सोडली जाते. या कारणास्तव, तुमचा रेफ्रिजरेटर थेट भिंतीला चिकटून न ठेवणं खूप महत्वाचं आहे. तसेच भिंतीला चिटकून ठेवला तर फ्रिज लवकर गरम होतो. त्याची काम करण्याची क्षमताही मंदावते तसेच थंड होण्यासाठी तो जास्त वेळ घेतो ज्यामुळे वीज बिल वाढतं.
फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?
त्यामुळे रेफ्रिजरेटर मागील भिंतींपासून आणि, वरच्या कॅबिनेटपासून 1 इंच अंतरावर आणि दोन्ही बाजूंनी किमान 1/4 इंच अंतरावर असावा. महत्वाचं म्हणजे तुमचा रेफ्रिजरेटर भिंतीपासून दूर ठेवण्याव्यतिरिक्त, तो थेट हीटर किंवा इतर उष्णता स्त्रोताजवळ न ठेवणे देखील महत्वाचे आहे. अशा पद्धतीने काळजी घेतली तर फ्रिज हा नक्कीच अजून जास्त काळ टिकेल.आणि तुम्ही जास्त काळ या उपक्रमाचा उपयोग करून घेऊ शकाल.