पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या भाज्या तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळ्या भाज्या पाहायला मिळतात ज्याचा तुमच्या आरोग्याला फायदा होतो. भाज्यांचा तुमच्या आहारात समावेश केल्यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळण्यास मदत होते. भाज्यांपैकी एक अशी भाजी आहे ज्याचा वापर तुम्ही भाजी बनवण्यासाठी आमि सॅलडमध्ये देखील करू शकता. ही भाजी म्हणजे टोमॅटो. टोमॅटोचा वापर आपल्या दैनंदिन आहारामध्ये होतो. कोणत्याही पदार्थामध्ये टोमॅटो मिक्स केल्यामुळे त्या पदार्थाची चव तर वाढतेच पंरतु तुमचं आरोग्य देखील निरोगी राहाते.
सॅलडमध्ये टोमॅटोचा वापर केल्यामुळे त्याची चव वाढते आणि तुमच्या शरीराला अधिक फायदे होतात. अनेकांना दररोज टोमॅटोचा ज्यूस प्यायला आवडते. टोमॅटोचा रस देखील तुमच्या निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जाते. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. व्हिटॅमिन सी तुमच्या शरीरासाठी उपयुक्त असते त्याच्या सेवनामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवते ज्यामुळे तुम्हाला संसर्गाचे आजार होत नाहीत.
तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये टोमॅटोच्या ज्यूसचा समावेश केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये बीटा कॅरोटीनची मात्रा योग्य होते. 1 ग्लास टोमॅटोच्या ज्यूसमध्ये जवळजवळ 22% बिटा कॅरेटिन असते ज्यामुळे तुमच्या आरोग्याला फयदा होतो. मार्केटमध्ये देखील टोमॅटोचा रस उपलब्ध असतो परंतु त्यामध्ये काही मात्रा साखरेचा वापर केला जातो. ज्यामुळे मधुमेहाच्या रूग्णांना फायदा होऊ शकतो. टोमॅटोचा ज्यूस बाहेरन घेऊण येण्यापेक्षा घरच्या घरी ट्राय करू शकता. टोमॅटोच्या ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, फ्लेव्होनॉइड्स, फायटोस्टेरॉल आणि अनेक पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वे आढळतात. टोमॅटो व्हिटॅमिन ए चा एक उत्तम स्रोत, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहाते. टोमॅटोमध्ये खूप कमी कॅलरीज असतात आणि त्यात भरपूर फायबर असते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये असलेले लायकोपीन यकृताची जळजळ रोखते आणि यकृत डिटॉक्सची प्रक्रिया वाढवते. टोमॅटोमध्ये आढळणारे लायकोपीन, कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते आणि हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते.
टोमॅटोचे या पद्धनीनं सेवन करा…
- सर्वप्रथम, कापलेले टोमॅटो एका झाकण असलेल्या पॅनमध्ये मध्यम आचेवर शिजवा.
- टोमॅटो शिजल्यावर गॅस बंद करा आणि टोमॅटो थंड होऊ द्या.
- टोमॅटो थंड झाल्यावर, ते स्मॅश करा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून रस चांगले मिक्स करा.
- कोथिंबीर, लाल सिमला मिरची आणि ओरेगॅनो मिसळल्याने टोमॅटोच्या सूपची चव, आणि पोषण दोन्ही वाढते.
- काळी मिरी पावडर, काळे मीठ आणि जिरे पावडर मिसळा आणि हिरव्या कोथिंबीरच्या पानांनी सजवून सर्व्ह करा.
- जर तुम्हाला सूप थोडा गोड प्यायला आवडत असेल तर टोमॅटो मिसळताना त्यात थोडे मध घाला.
- अगदी चविष्ट आणि हेल्दी टोमॅटोचा सूप तयार आहे.