सिंगापूर आणि हाँगकाँग इतर देशात कोरोना पुन्हा झपाटयाने वाढत आहे. आता राज्यातही सावधानता बाळगण्याची सूचना जारी झाल्या आहेत. कोरोनामुळे २५७ केसेस महाराष्ट्रात आढळल्या आहेत. मुंबईतही कोरोनाच्या केसेस आढळल्या आहेत.मुंबई महानगरापालिकेच्या आकडेवारीनुसार 53 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहे. तसेच कोरोनाच्या संक्रमनामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.
हाँगकाँग आणि सिंगापूर या दोन आशियाई देशांमध्ये कोरोना विषाणूच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत. सिंगापूरमध्ये रुग्णांच्या संख्येत २८% वाढ झाली आहे, तर हाँगकाँगमध्ये फक्त एका आठवड्यात ३१ गंभीर रुग्णांची नोंद झाली आहे. कोविड-१९ च्या रुग्णांची अंदाजे संख्या १४,२०० पर्यंत वाढल्याने सिंगापूरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल होण्याच्या संख्येतही सुमारे ३०% वाढ झाली. महाराष्ट्रात कोरोनाच्या २५७ केसेस आणि मुंबईतही ५३ केसेस आढळल्या आहेत.
भारतातही कोरोनाचे आकडे वेगाने वाढत आहेत. १२ मे पासून कोरोनाचे १६४ नवे रुग्ण आढळ असल्याने खळबळ उडाली आहे.एकूण सक्रिय कोविड प्रकरणांची संख्या २५७ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडू आघाडीवर ही परदेशी प्रवासी सर्वाधित येणारी राज्ये आघाडीवर आहेत. आता आरोग्य मंत्रालयानेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
आरोग्य मंत्र्यांनी काय म्हटले?
त्यामुळे साथीची स्थिती असल्याची कबूली राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहे. मुंबईत आढळलेल्या ५३ केसेसपैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांची प्रकृती आधीपासूनच गंभीर होती. त्यातील एकाला कर्करोग होता तर दुसऱ्याला नेफ्रोटिक सिंड्रोम होते. हे दोन्ही रुग्ण मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल होते.
केंद्राची दक्षता
कोरोनाच्या वाढत्या केसेसवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व स्थितीवर आम्ही नजर ठेवून असून सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज करण्यात आल्याचे म्हटले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. गेल्या सोमवारी, आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, आपत्कालीन वैद्यकीय मदत विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि केंद्र सरकारी रुग्णालयांमधील तज्ज्ञांसह एक आढावा बैठक झाली असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.