बंगळुरू हे सर्वात जास्त गर्दी असलेल्या शहरांपैकी एक आहे. तर येथील लोकं सकाळपासून रात्री उशिरापर्यंत त्यांच्या कामात व्यस्त असतात. अशातच अजून काही दिवस सुट्टीचा आनंद घेण्यासाठी लोकं त्यांच्या कुटुंबासह किंवा मित्रांसह बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तुम्ही बाहेर फिरायला जात असाल तर बंगळुरू शहराला एकदा भेट द्याच. तसेच येथे भेट देण्यासाठी बंगळुरू पॅलेस, लालबाग बोटॅनिकल गार्डन आणि उलसूर तलाव अशी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
पण तुम्ही बंगळुरू येथून 100 किमी अंतरावर असलेल्या या सुंदर ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन करू शकतात. येथे तुम्हाला गर्दीपासून दूर शांततेत वेळ घालवण्याची संधी मिळेल. याशिवाय येथील नैसर्गिक दृश्ये खूप मनमोहक आहेत. तसेच तुम्हाला जर निसर्गाच्या सांनिध्यात राहून नेचर फोटोग्राफी करायला आवडत असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य असेल. चला तर मग आजच्या या लेखात आपण बंगळुरू येथील ठिकाणंबद्दल जाणून घेऊयात…
नंदी हिल्स
नंदी हिल्स बंगळुरूपासून सुमारे 60 किमी अंतरावर आहे. येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला 1 ते 2 तास लागू शकतात. हे बंगळुरू येथील खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणांच्या इतिहासामुळे ते खूप प्रसिद्ध आहे. चिकबल्लापूर रेल्वे स्टेशन हे नंदी हिल्सपासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे, येथून हे हिल्स 9 किमी अंतरावर आहेत. येथे तुम्हाला निसर्गाचे सुंदर दृश्ये पाहायला मिळेल. तर तुम्हाला सकाळी 6 ते 6.30 दरम्यान सूर्योदयाचे अद्भुत दृश्य पाहता येईल. तुम्ही या ठिकाणी देवनहल्ली किल्ला पाहू शकता आणि भोगानंदीश्वर मंदिराला भेट देऊ शकता.
स्कंदगिरी
स्कंदगिरी हे एक अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे, जे कर्नाटकात येणाऱ्या बंगळुरूपासून 62 किमी अंतरावर आहे. ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे त्यांनी या ठिकाणाला भेट देण्याचा विचार करू शकतात. इथे तुम्हाला शांततेत वेळ घालवण्याची संधी मिळेल. यासोबतच, येथील सूर्योदय पाहण्याची संधी गमावू नका. तुम्हाला येथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करण्याची संधी देखील मिळू शकते. स्कंदगिरी हिल्सच्या माथ्यावर भगवान शिव यांना समर्पित एक मंदिर आहे, तुम्ही तिथे दर्शनासाठी देखील जाऊ शकता.
चुंची धबधबा
बंगळुरू ते चुंची फॉल्स हे अंतर सुमारे 80 ते 90 किलोमीटर आहे. कर्नाटकातील कनकपुरा येथून मेकेदाटू आणि संगमला जाताना तुम्हाला हा धबधबा दिसेल. तुम्ही येथे भेट देण्यासाठी देखील जाऊ शकता. येथील नैसर्गिक सौंदर्य तुमचे मन मोहून टाकेल. हे एक परिपूर्ण असे पिकनिक स्पॉट असेल. याशिवाय, येथून सूर्यास्ताचे दृश्य देखील खूप मनमोहक आहे. तुम्ही आठवड्याच्या शेवटी कुटुंब किंवा मित्रांसह हे ठिकाण एक्सप्लोर करू शकता.