Hast Reksha Shastra: तुमच्या तळहातावर आहे क्रॉसचे चिन्ह, श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही

आपल्या तळहातावर अनेक प्रकारचे चिन्ह बनलेले असतात, त्यापैकी एक म्हणजे गुणाकार क्रॉसचे चिन्ह. जर तुमचा ज्योतिशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्हाला हस्तरेषांवर देखील विश्वास असेल. तसेच हे सर्व एकमेकांशी संबंधित असतात आणि त्यांचा तुमच्या आयुष्यातही चढ – उतार, चांगल्या आणि वाईट काळाशी थेट संबंध असतो.

प्रत्येक ग्रहाचे स्थान व्यक्तीच्या तळहातावर निश्चित केलेले असते. यासोबतच तळहातावर अनेक प्रकारच्या खुणा आणि रेषा असतात. त्यांचेही स्वतःचे महत्त्व असते. हस्तरेषाशास्त्रानुसार तुमच्या तळहाताच्या ओळी वाचून तुमचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ सांगतात. अशा स्थितीत तुमच्या तळहातावर रेषेवर बनलेले चिन्ह कधी कधी अनेकांना भाग्यवान बनवतात, तर काही चिन्ह तुमच्या आयुष्यात अशुभ परिणाम ही देतात. जर तुमच्या तळहातावर कोणत्याही प्रकारचा क्रॉसचे चिन्ह तयार होत असेल तर त्याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होतो हे जाणून घ्या.

क्रॉस तळहातावर कुठेही तयार होत असला तरी हाताच्या या तीन ठिकाणी तयार झालेल्या क्रॉस ला खूप महत्व आहे. या क्रॉसला खऱ्या अर्थाने ‘मिस्टिकल क्रॉस’ म्हणतात.तळहातावरील हृदय आणि मेंदूच्या रेषांमधील असलेल्या गॅप मध्ये क्रॉस तयार होतात. तसेच गुरु पर्वत आणि सूर्य पर्वतावर ते खास तयार होतात.

तळहातावरील ‘मिस्टिकल क्रॉस’ चे महत्व

हृदय आणि मेंदूच्या रेषांमध्ये तयार होणारा क्रॉस हे व्यक्तीच्या भावनिक आणि बौद्धिक या मधील बाजू संतुलन दर्शवितो. व्यक्तीच्या जीवनातील अध्यात्म आणि ज्ञानाकडे असलेला कलही यातून दिसून येतो.

गुरु पर्वतावरील तयार झालेले क्रॉस गुरुचे भाग्य आणि आध्यात्मिक उन्नती दर्शवितो. असे लोकं खूप नशीबवान असतात. ते धन आणि ज्ञान या दोन्हीबाबतीत श्रेष्ठ आहेत.

तळहातावर असलेल्या सूर्य पर्वतावरील क्रॉस व्यक्तीची प्रतिष्ठा आणि कीर्ती दर्शवितो. असे लोकं मोठे राजकारणी, प्रशासकीय अधिकारी बनतात. ज्यांच्या तळहातावर क्रॉस सूर्य पर्वताच्या भागात असतो. त्या लोकांना भरपूर ऐश्वर्य प्रदान होते आणि ऐशोआरामाचे जीवन जगतात.

क्रॉसच्या मदतीने मिळणारा लाभ

हस्तरेखा तज्ज्ञांच्या मते, ज्या व्यक्तींच्या तळहातावर या रेषा किंवा क्रॉस असतात ती लोकं मोठे यश मिळवतात. हि लोकं आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या खूप चांगले मन त्यात गुंतवतात. लोकांना मदत करणे हा त्यांचा मूळ स्वभाव असतो. अशातच हि लोकं नेतृत्वाचे मुख्य कार्य पार पाडत असतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)