haircare tips: केस गळतीच्या समस्यांपासून त्रस्त आहात? घरच्या घरी ‘या’ सोप्या ट्रिक्स करा फॉलो

उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यासह केसांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही पर्लरमध्ये हजारो रूपय खर्च करता परंतु तुमच्या केसांवर त्याचा काही परिणााम होत नाही. प्रत्येक स्त्रीला मऊ आणि रेशमी केस हवे असतात. पण आजकाल वाईट जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आपल्या आरोग्यावर तसेच केसांवर दिसून येतो. कोरड्या केसांच्या समस्येने अनेक लोक त्रस्त असतात. केस मजबूत, मऊ आणि रेशमी बनवण्यासाठी ते महागडे केसांची निगा राखणारे उत्पादने वापरतात. पण यानंतरही कोणताही महत्त्वाचा परिणाम दिसून येत नाही.

मार्केटमधील रसायनिक पदार्थांचा वापर केल्यामुळे तुमच्या केसांवर गंभीर परिणाम दिसून येतो. या पदार्थांच्या वापरामुळे तुम्हाला केस गळती, कोंडा होणे आणि केस पाढरे होणे यांच्या सारख्या समस्या होण्याची शक्यता असते. पण घरी असलेल्या काही गोष्टी तुमचे केस नैसर्गिकरित्या रेशमी आणि चमकदार तसेच मजबूत बनवण्यास मदत करू शकतात. तुम्ही या गोष्टींचा हेअर मास्क बनवू शकता आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लावू शकता. चला जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल

दही – दही एक प्रोबायोटिक आहे. हे केसांच्या कूपांना मजबूत करण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. तसेच कोंड्याची समस्या दूर करण्यास मदत होते. तुम्ही त्याचा हेअर मास्क बनवून लावू शकता. यासाठी एक चमचा दही घ्या आणि त्यात दोन चमचे आवळा पावडर घाला आणि मिक्स करा. ते टाळू आणि केसांना 25 ते 30 मिनिटे लावल्यानंतर, केस शॅम्पूने धुवा. पण आधी पॅच टेस्ट करा.

ऑलिव्ह ऑइल – ऑलिव्ह ऑइल आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड असतात, जे केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. केसांना कोमट तेल लावून मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे टाळू निरोगी होते. 1 ते 2 तासांनी शॅम्पू करा.

कोरफड – कोरफड केस आणि त्वचेला हायड्रेशन देण्याचे काम करते. यामध्ये असलेले अँटीसेप्टिक आणि अँटी-फंगल गुणधर्म कोंडा कमी करण्यास आणि केसांना रेशमी बनविण्यास मदत करतात. यासोबतच केस गळतीची समस्याही कमी होऊ शकते. तुम्ही ताज्या कोरफडीच्या जेलमध्ये नारळाचे तेल मिसळून केसांना लावू शकता. 30 ते 40 मिनिटे केस ठेवल्यानंतर धुवा.

केळी आणि मध – केसांना रेशमी आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही केळी आणि मध देखील वापरू शकता. यासाठी केळी सोलून मॅश करा, नंतर त्यात थोडे मध घाला. ही पेस्ट केसांना 20 ते 25 मिनिटे लावा आणि नंतर शॅम्पू करा. यामुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत होईल, ज्यामुळे केस कमी कोरडे होतील. तसेच, ही पेस्ट केसांना मजबूत करण्यास मदत करू शकते.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)