ऐन तारुण्यात केस पांढरे झाले? Image Credit source: tv9
आजकाल कोणत्याही वयात केस पांढरे होतात. अगदी तरुण मंडळींचे केस तुम्हाला पांढरे दिसतील. 25 आणि तिशीतच हल्ली केस पांढरे होऊ लागतात. पण, तुम्हाला माहिती आहे का की, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पांढरे केस होतात, कमी वयात पांढरे केस का वाढतात? तज्ज्ञांकडून याविषयी जाणून घ्या.
सध्या कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वयाच्या 30 ते 35 व्या वर्षी केस पांढरे होत आहेत. तुम्हालाही ही समस्या असेल तर कमी वयात केस पांढरे का होतात आणि यामागचे कारण काय आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. हे जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. यावर तुम्ही पुढे सविस्तर वाचू शकतात.
दिल्लीतील आरएमएल रुग्णालयातील त्वचारोग विभागातील निवृत्त डॉ. भाविक धीर सांगतात की, लहान वयात केस पांढरे होण्यामागे व्हिटॅमिनची कमतरता कारणीभूत ठरू शकते, शरीरात व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन B9 ची कमतरता असेल तर केस पांढरे होण्याचा धोका असतो.
2019 मध्ये द लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकातील एका अहवालात म्हटले आहे की, लहान वयात केस पांढरे होण्यामागे व्हिटॅमिनची कमतरता हे एक प्रमुख कारण आहे. अनेक लोकांमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात.
केस पांढरे का होतात?
दिल्ली सरकारमधील आयुर्वेदाचे डॉ. आर. पी. पराशर सांगतात की, ज्या लोकांच्या शरीरात पित्त जास्त असते, त्यांचे केसही लहान वयातच पांढरे होतात. याशिवाय कमी वयात केस पांढरे होण्यामागे खराब आहार हे देखील एक प्रमुख कारण आहे.
जास्त पित्त निर्मिती मुळे केसांच्या मुळांचे नुकसान होते, ज्यामुळे केस पांढरे होऊ शकतात. जास्त पित्त उत्पादनामुळे, काही लोकांना शरीरात मेलेनिनची कमतरता असू शकते, ज्याचा केसांच्या रंगावर परिणाम होतो. जर तुमच्या ही शरीरात पित्त जास्त असेल तर त्रिफळा (आयुर्वेदिक वनस्पती) खा आणि तुम्ही रोज प्राणायामही करू शकता.
व्हिटॅमिनची कमतरता कशी दूर करावी?
आहारतज्ज्ञ डॉ. अंजिल वर्मा सांगतात की, व्हिटॅमिन B12 आणि B9 ची कमतरता भरून काढण्यासाठी आपण आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करणे महत्वाचे आहे. याशिवाय तुम्ही अंडी सॅल्मन फिशही खाऊ शकता. व्हिटॅमिन D ची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही दूध, दही अंडी खाऊ शकता.
आपण प्रथम व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D ची चाचणी घेणे महत्वाचे आहे. जर ही जीवनसत्त्वे कमी असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही पूरक आहारही घेऊ शकता. यामुळे व्हिटॅमिनची कमतरता सहज दूर होऊ शकते.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)