संभाजी भिडे गुरुजींवर कुत्र्याने कुठे आणि कसा केला हल्ला? घटनास्थळावरून ग्राउंड रिपोर्ट

15 Apr 2025, 4:06 pm

सांगलीत संभाजी भिडे गुरुजींंवर कुत्र्यांनी हल्ला करत चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार देखील करण्यात आले. सध्या त्यांची उत्तम आहे. सांगलीतील माळी गल्ली या ठिकाणी ही घटना घडली. ही घटना नेमकी कशी घडली? कोणत्या ठिकाणी कुत्र्याने चावा घेतला, त्याचा प्रत्यक्ष घटनास्थळावरून आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी स्वप्निल एरंडोलीकर यांनी..

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)