मोठी बातमी! महायुतीमध्ये नाराजी नाट्य; राष्ट्रवादीच्या आमदाराचे अजितदादांसमोर शिवसेनेवर आरोप, केली मोठी मागणी

मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी अजित पवारांसमोरच नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी शिवसेनेचं नाव न घेता निशाणा साधला आहे. महायुतीच्या नेत्यांकडून त्रास होत अल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. मला अनेक प्रकारचा त्रास झाला आहे, माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं सरोज अहिरे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या भगूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाणिपुरवठा योजनेचं उद्घाटन झालं त्यावेळी त्या बोलत होत्या.

नेमकं काय म्हणाल्या अहिरे? 

मला अनेक प्रकारचा त्रास झाला आहे, माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे,  आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो, मित्रपक्षाच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा. भगूरमध्ये तुम्ही काम करू नका असं मला सांगितलं जातं  असा आरोप सरोज अहिरे यांनी केला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, माझी विनंती आहे, दादा मला पण असं चांगलं वाटत नाही की आपल्यासमोर सगळेच हा पाढा वाचतात. पण मलाही त्रास होतो. पण दादा आपल्यालाही माहिती आहे, आपल्याशिवाय कुणाचाही राजकीय वरदहस्त माझ्यावर नाहीये. मी सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. पण अशी काही लोक आहेत, अशी काही अतृप्त आत्मे आहेत. की ज्यांचं समाधान होत नाही. ते जनतेचा पाठिंबा तोडण्याचं काम करत आहेत.  दादा देवळाली कॅन्टोन्मेंटसाठी एक 75 कोटींचा आराखडा पाणीपुरवठा योजनासाठी आपण तयार केलेला आहे त्याचाही पाठपुरावा आमच्याकडून सुरू आहे, असं अहिरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज आनंदाचा दिवस आहे, कारण सावरकरांच्या जन्मभूमीत राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन केले. आपल्याला दुपारी पत्रकारांनी काही प्रश्न विचारलेत आणि आपण त्याला आपल्या शैलीमध्ये उत्तर दिलेलं आहे. पाणीपुरवठा योजना कशी मंजूर झाली ते सांगते. हे 25 वर्ष सत्तेत होते ते करू शकले नाही. मी काम मंजूर करून आणायचे आणि त्याचे श्रेय घेण्याचे सत्र गेली पाच वर्ष सहन केलं. तुमची लहान बहीण म्हणून तुमचा हात डोक्यावर राहू द्या, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)