खगोल प्रेमी सह धार्मिक लोकांसाठी ग्रहण एक महत्वाची घटना असते. त्यामुळे सुर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची लोक आतुरतेने वाट पाहात असतात. साल २०२५ मध्ये चार ग्रहण लागणार आहेत. त्यातील दोन सुर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण असणार आहेत. या चार ग्रहणांपैकी केवळ एकाचे दर्शन भारतातून होणार आहे. चला तर पाहूयात यंदा २०२५ मध्ये एकूण किती ग्रहण लागणार आहेत आणि कोणते ग्रहण भारतातून दिसणार आहे.
Grahan in India 2025:
पहिले चंद्रग्रहण २०२५ – भारतातून दिसणार नाही
या वर्षांचे पहिले ग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. म्हणजे हे खग्रास चंद्रग्रहण १४ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार दिवसाचे लागणार आहे. त्यामुळे अर्थातच हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही, साल २०२५ चे पहिले चंद्रग्रहण अमेरिका, पश्चिम युरोप, पश्चिम आफ्रीका आणि उत्तर आणि दक्षिण अटलांटिक महासागरात दिसणार आहे.
पहिले सुर्यग्रहण २०२५ – भारतातून दिसणार नाही
वर्ष २०२५ चे पहिले सुर्यग्रहण अंशत: म्हणजे खंडग्रास ग्रहण असणार आहे. हे सुर्यग्रहण २९ मार्च रोजी लागणार आहे. हे सुर्यग्रहण देखील भारतातून दिसणार नाही. हे सुर्यग्रहण केवळ उत्तर अमेरिका, ग्रीनलँड, आईसलँड, उत्तर अटलांटिक महासागर, युरोप आणि उत्तर -पश्चिम रशियात दिसणार आहे.
दुसरे चंद्रग्रहण २०२५ – भारतातून दिसणार
साल २०२५ ते दुसरे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यात दिसणार आहे, जे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. हे चंद्रग्रहण आशियातील अन्य देशांसह युरोप, अंटार्टिका, पश्चिम प्रशांत महासागर, ऑस्ट्रेलिया आणि हिंद महासागरात देखील दिसणार आहे.
हे चंद्रग्रहण भारतीय वेळे नुसार ७ सप्टेंबर रोजी रात्री ८.५८ वाजल्यापासून ते ८ सप्टेंबर २.२५ वाजेपर्यंत चालणार आहे. या दरम्यान चंद्र गडद लाल रंगाचा दिसणार आहे. ज्याला ‘ब्लड मून’ देखील म्हटले जाते.
वर्षअखेरचे सुर्यग्रहण २०२५ – भारतातून दिसणार नाही
वर्षांचे शेवटचे ग्रहण सुर्यग्रहण असणार असून ते २१-२२ सप्टेंबर रोजी लागणार आहे. हे सुर्यग्रहण आंशिक खंडग्रास ग्रहण असणार आहे. परंतू हे सुर्यग्रहण देखील भारतातून दिसणार नाही. आंशिक सुर्यग्रहण न्युझीलंड, पूर्व मेलानेशिया, दक्षिणी पोलनेशिया आणि पश्चिम अंटार्टिका येथून दिसणार आहे.