लोकसभा निवडणूक सातवा टप्पा:
१८ व्या लोकसभा निवडणकीचे सातव्या व अंतिम टप्प्यातील मतदान शनिवार पार पडणार आहे. जे आठ राज्यातील आणि केंद्र शासित प्रदेशातील ५७ मतदारसंघात होणार आहे. या टप्प्यात काही मोठी नावे दिसणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे उत्तर प्रदेशमधील वाराणसीतून तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. भाजपाचे दिग्गज आणि माजी केंद्रिय मंत्री रवी शंकर प्रसाद (पटना साहिब), अभिनेत्री कंगना रनौत (मंडी), काँग्रेसचे मनिष तिवारी (छत्तीसगढ), समाजवादी पार्टीचे नेते अफजल अन्सारी (गाझीपूर) आणि भोजपूरी अभिनेता पवन सिंग (करकट) हे उमेदवार अंतिम टप्प्यात असणार आहेत.
५७ मतदारसंघातून एकूण ९०४ उमेदवार रिंगणात आहेत, ज्यात १० कोटींहून अधिक लोक मतदानासाठी पात्र असणार आहेत. बिहार (८/४० जागा), हिमाचल प्रदेश (४/४), झारखंड (३/१४), ओडीसा (६/२१), पंजाब (१३/१३), उत्तरप्रदेश (१३/८०), पश्चिम बंगाल (९/४२) आणि चंदीगढ केंद्रशासित प्रदेश अशा राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात सातव्या टप्प्यातील निवडणुका होणार आहेत. १९ एप्रिलपासून सुरु झालेल्या आणि ६ टप्पे पूर्ण केलेल्या तसेच ४८६ लोकसभा जागांचा समावेश असलेल्या या जगातील सर्वात मोठ्या मतदान मॅरेथॉनची समाप्ती होईल.
गुगल डूडल म्हणजे काय?
गुगल डूडल संक्षिप्त आणि तात्पुरते बदल आपल्या गुगल लोगोत करतो. एखाद्या स्थानिक तसेच जागतिक घटनेला आदरांजली वाहण्याचे काम डूडलद्वारे केले जाते. जसे की सुट्ट्या, महत्त्वाच्या तारखा आणि ज्या व्यक्तीने समाजात उल्लेखनीय कामगिरी केली असेल यांवर डूडल तयार केले जाते.