मुंबईकरांसाठी गुड न्यूज, रेल्वेकडून नवीन रेक मिळताच या लोकलच्या फेऱ्या वाढल्या

New ac local in mumbai: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. पश्चिम रेल्वेने बुधवारपासून लोकलच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. रेल्वेकडून लोकलचे नवीन रेक प्राप्त होताच एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या ९६ फेऱ्या एसी लोकलच्या होत होत्या. त्या वाढवून १०९ करण्यात आल्या आहेत. १३ लोकल वाढल्यामुळे एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच सोय होणार आहे.

मागील आठवड्यात रेल्वेला एसी लोकलची नवीन रेक मिळाल्या. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वेगाने वाढत आहे. यामुळे या लोकल सेवाचा विस्तार करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. त्यानंतर लोकल सेवाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. आता २७ नोव्हेंबर रोजी नवीन एसी लोकल ट्रेन दुपारी १२.३४ मिनिटांनी रवाना होणार आहे.

भाईंदरकडे विशेष लक्ष

एसी लोकलचा विस्तार करताना भाईंदरमधील प्रवाशांकडे विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. १३ नवीन एसी लोकमधून ७ लोकल भाईंदरमधून सुटणार आहे. १३ लोकलपैकी सहा ट्रेन अप आणि ७ लोकल ट्रेन डाऊन मार्गाच्या आहेत. अप मार्गामध्ये विरार-चर्चगेट आणि भाईंदर-चर्चगेट दरम्यान 2-2 लोकल असतील. विरार- वांद्रे आणि भाईंदर- अंधेरी दरम्यान एक-एक लोकल सेवा असणार आहे. डाउन मार्गात चर्चगेट-विरार दरम्यान दोन सेवा, चर्चगेट- भाईंदर, अंधेरी- विरार, वांद्रे-भाईंदर, महालक्ष्मी-बोरीवली आणि बोरीवली- भाईंदर दरम्यान एक, एक एससी लोकल असणार आहे.

परंतु या प्रवाशांची होणार अडचण

पश्चिम रेल्वे १३ नवीन एसी लोकल सुरु करत आहे. त्यामुळे एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. दुसरीकडे १३ नॉन एसी लोकल कमी करण्यात येणार आहे. या लोकलच्या जागीच नवीन एसी लोकल सुरु करण्यात येणार आहे. यामुळे नॉन एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अडचण होणार आहे. त्यामुळे सामान्य प्रवासी नाराज होणार आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)