शाकाहारी थाळी झाली स्वस्त, नॉनव्हेज खवय्यांसाठीही गुड न्यूज

सध्या सगळीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफची, कोसळणाऱ्या शेअर्सची चर्चा असताना आज आम्ही तुम्हाला एक वेगळी माहिती सांगणार आहोत. ही माहिती तुम्हाला दिलासा देणार आहे. व्हेज आणि नॉनव्हेज थाळी स्वस्त झाली आहे. क्रिसिल इंटेलिजन्सच्या ताज्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता तुमच्या खिशाला कुठेही झळ बसणार नाही. एकप्रकारे तुम्हाला यातून दिलासाच मिळाला आहे, असं म्हणावं लागेल. आता क्रिसिल इंटेलिजन्सच्या ताज्या अहवालात नेमकं काय आहे, याची पुढे माहिती जाणून घेऊया.

तुलनेत घरगुती शाकाहारी थाळीच्या दरात 3 टक्क्यांनी घसरण झाली आहे, तर मांसाहारी थाळीचे दर गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत मार्चमध्ये स्थिर आहेत. शाकाहारी थाळीतील घसरण (गेल्या वर्षी याच कालावधीत) टोमॅटोच्या दरात झालेल्या घसरणीमुळे झाली होती.

क्रिसिल इंटेलिजन्सच्या ताज्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. मार्च 2025 मध्ये घरगुती शाकाहारी आणि मांसाहारी थाळीच्या किंमतीत मागील महिन्याच्या तुलनेत 2 ते 5 टक्क्यांनी घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

कांदा, बटाटा आणि टोमॅटोच्या दरात मागील महिन्याच्या तुलनेत अनुक्रमे 5 टक्के, 7 टक्के आणि 8 टक्क्यांनी घट झाली आहे. पिकाची नव्याने आवक झाल्याने थाळीच्या दरात घट झाली आहे. ब्रॉयलर चिकनच्या दरात अंदाजे सात टक्क्यांनी घट झाल्याने मांसाहारी थाळीच्या दरात कपात करण्यात आली आहे. उत्तरेत पुरवठा वाढल्याने आणि दक्षिणेत बर्ड फ्लूच्या भीतीने मागणी घटल्याने ब्रॉयलरचे दर घसरले आहेत.

गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या तुलनेत घरगुती शाकाहारी थाळीच्या दरात 3 टक्क्यांनी घसरण झाली आहे, तर मांसाहारी थाळीचे दर गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत मार्चमध्ये स्थिर आहेत. शाकाहारी थाळीतील घसरण (गेल्या वर्षी याच कालावधीत) टोमॅटोच्या दरात झालेल्या घसरणीमुळे झाली होती.

टोमॅटोचे दर वार्षिक आधारावर 34 टक्क्यांनी घसरले टोमॅटोचे दर मार्च 2024 मधील 32 रुपये प्रति किलोवरून मार्च 2025 मध्ये 34 टक्क्यांनी घसरून 21 रुपये प्रति किलो झाले.

देशभरात टोमॅटो पिकाची आवक 29 टक्क्यांनी वाढली आहे. विशेषत: दक्षिणेकडील राज्यांमध्ये ही वाढ दिसून आली, जिथे वाढीव क्षेत्र आणि जलाशयाची पातळी चांगली असल्याने चांगले उत्पादन मिळाल्याने रब्बीचे पीक चांगले होते. मात्र, बटाटा, कांदा आणि वनस्पती तेलाच्या दरात अनुक्रमे 2 टक्के, 6 टक्के आणि 19 टक्के वाढ झाल्याने शाकाहारी थाळीच्या दरात आणखी घसरण होऊ शकली नाही.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)