मुंबई : वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून सोमवारी दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांना पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राजावाडी हॉस्पिटल येथे जाऊन भेट दिली.सध्या राजावाडी रुग्णालयात एक जण आयसीयूमध्ये असून इतरांच्या प्रकृतीमध्ये समाधानकारक सुधारणा होत असल्याचं मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकारकडून केला जाणार आहे. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यामंत्री यांच्याशी चर्चा करून जखमींना कायद्यातील तरतुदींप्रमाणे योग्य तो आर्थिक मोबदला दिला जाईल, असं देखील पालकमंत्री लोढा यांनी सांगितलं.
६० टक्क्यांपेक्षा कमी व्यंग असल्यास अशा व्यक्तींना ७५,००० रुपये, तर ६० टक्क्यांपेक्षा जास्त व्यंग असल्यास, त्या व्यक्तींना अडीच लाख रुपये सरकारद्वारे देण्यात येतील. तसंच किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपये देण्यात येतील अशी घोषणा यावेळी पालकमंत्री लोढा यांनी केली आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.
सदर जाहिरातीचं मोठं होर्डिंग हे पेट्रोल पंपाजवळ अनधिकृतरित्या बांधण्यात आलं होतं. महापालिकेने नोटीस बजावून सुद्धा होर्डिंग हटवण्यात आलं नाही. त्या होर्डिंगचं सेफ्टी ऑडिट किंवा तत्सम प्रक्रिया सुद्धा झाल्याचं आढळून आलेलं नाही. त्यामुळे या घटनेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला पोलीस पकडतील, त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. ही दुर्घटना नसून हत्या आहे असं मंत्री लोढा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

दरम्यान, सोमवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यावेळी पेट्रोल पंपावर काही वाहनं इंधन भरण्यासाठी आली होती. तर काही वाहनं पावसापासून बचावासाठी इथे थांबली होती. त्यावेळी वादळी वाऱ्याने १२० फूट उंच आणि २५० टन वजनाचं हे बेकायदेशील होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं. हे होर्डिंग भावेश भिंडे याच्या मालकीचं होतं. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता तो फरार असून पोलिसांनी अनेक पथकं त्याला शोधण्यासाठी तयार केली आहेत.