उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे धनंजय मुंडे अडचणीत असताना शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांनी मौन धारण केलं आहे. गेल्या अनेक दिवसांत ते माध्यमांसमोर आलेले नाहीत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली. आरोपांची झळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे धनंजय मुंडे अडचणीत असताना शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांनी मौन धारण केलं आहे. गेल्या अनेक दिवसांत ते माध्यमांसमोर आलेले नाहीत. देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी कोणतीही ठाम भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील महत्त्वाचा चेहरा असलेले पाटील गप्प का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.वडिलांच्या मॅडमनं त्यांचा गैरवापर केला! जवानानं आयुष्य संपवलं, वाचलेल्या लेकीचा गंभीर आरोप
जयंत पाटील सध्या काय करतात, ते नेमके आहेत कुठे, असे प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जात असताना पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची आणि त्यातील प्रमुख पाहुण्यांची जोरदार चर्चा आहे. जयंत पाटील यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पोहोचले आहेत. पाटील यांनी उद्घाटनासाठी गडकरींना दिलेल्या आमंत्रणाची सध्या चर्चा आहे. त्यामुळे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना बळ मिळत आहे.सरकारी अभियंता कुबेर निघाला; ६ ठिकाणांवर छापे; १७ भूखंड, १८ बँक खाती सापडली; एका टिपमुळे गेम
इस्लामपूरमधील जयंत पाटील यांच्या शिक्षण संकुलात आयोजित कार्यक्रमाला नितीन गडकरी हजर आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची धूळधाण उडाल्यानंतर जयंत पाटील शांत आहेत. त्यांनी सरकारवर फारशी टीका केलेली नाही. त्यातच पक्षातील नेते पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद काढून घ्यावं, अशी मागणी सातत्यानं करत आहेत. त्यामुळे पाटील लवकरच पक्षांतर करतील अशी चर्चा आहे.