FYJC Admission 2024 : अकरावीची नोंदणी प्रक्रिया संथ गतीने, कशा असतील प्रवेश फेऱ्या? लक्षात ठेवा या तारखा

प्रतिनिधी, पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ज्युनिअर कॉलेजांमध्ये राबविण्यात येणाऱ्या अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत आतपर्यंत ८० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पैकी साधारण २५ हजार विद्यार्थ्यांनी कॉलेजांचे पर्याय भरले आहेत. यंदा दहावीचा निकाल वाढला असला, तरी त्या प्रमाणात विद्यार्थ्यांची नोंदणी झाली नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने पुणे-पिंपरी चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावतीमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत ३४३ कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी एकूण एक लाख १९ हजार ९७० जागा उपलब्ध आहेत. या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत अर्जाचा ‘भाग १’ आणि १६ जूनपर्यंत अर्जाचा ‘भाग २’ भरता येणार आहे.

नागरिकांना दिलासा! नक्षत्रवाडी झोनला मिळणार २४ तास पाणी, ‘या’ निकषांनुसार केला जाणार पाणीपुरवठा
साधारण २५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आपल्या आवडीच्या कॉलेजांचे पर्याय भरले असून, तीन हजार ५०० विद्यार्थ्यांनी ‘कोटां’तर्गत प्रवेशासाठी अर्ज भरले आहेत. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास, यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे. नोंदणी करून अर्जाचे ‘भाग १’ आणि ‘भाग २’ भरणाऱ्य़ा विद्यार्थ्यांचा अर्ज प्रवेशाच्या गुणवत्ता यादीसाठा ग्राह्य धरला जातो. मात्र, सध्या ही प्रक्रिया थंडावल्याचे दिसत आहे.

यंदा दहावीच्या निकालात साधारण दोन टक्क्यांनी उत्तीर्णांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, सध्या असे चित्र पाहायला मिळत नाही.

यंदा तीन नियमित फेऱ्या

अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या यंदा तीन नियमित फेऱ्या आणि एक विशेष फेरी होणार आहे. पहिल्या फेरीसाठी प्रवेशाची यादी २६ जूनला प्रसिद्ध करण्यात येईल. या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना २६ ते २९ जून दरम्यान प्रवेश घेता येईल. कॉलेजात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना कागदपत्रे आणि शुल्क जमा करावे लागेल. एक जुलैपासून दुसऱ्या प्रवेश फेरीला सुरुवात होईल.

कशी असेल अकरावी प्रवेशप्रकिया?

प्रवेशासाठी अर्जाची लिंक : https://pune.11thadmission.org.in

ज्युनिअर कॉलेज : ३४३

प्रवेशक्षमता : १ लाख १९ हजार ९७०

कॅप प्रवेश क्षमता : ९३,४६३

कोटा प्रवेश क्षमता : २६,५०७