उन्हाळ्यात आपण पोट आणि शरीर थंड ठेवण्यासाठी फळांचे भरपूर सेवन करत असतो. या कडक उन्हाळ्यात शरीरा हायड्रेट राहाण्यासाठी हंगामी फळांचा ज्यूस देखील पितो, त्यामुळे बाजारातुन फळे खरेदी करून घरीच फळांचा ज्यूस व फळे खात असतो. पण तुम्हाला माहिती आहे का? फळे खरेदी करताना आपण अनेकदा काही मोठ्या चुका करतो. आपण जेव्हा फळे खरेदी करतो तेव्हा बाहेरून फळे पाहूनच खरेदी करतो. पण कधीकधी असे होते की ही फळं गोड नसतात. बऱ्याचदा ते बाहेरून चांगली दिसणारी फळे आतून खराब असतात. तर आज आम्ही तुम्हाला फळे खरेदी करण्यासंबंधित काही खास टिप्स सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात.
कलिंगड हे फळ वरून चांगले दिसत असले तरी ते आतून गोड आहे की नाही हे ओळखणे खूप कठीण आहे? त्याचबरोबर टरबूज आकाराने लहान असला तरी तो आतून गोड आहे की नाही हे सुद्धा ओळखणे कठीण होते. आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही फळे गोड आहेत की नाही हे सहज ओळखू शकाल?
कलिंगड गोड आहे की नाही?
कलिंगड किंवा इतर कोणत्याही फळाचा गोडपणा किंवा चव त्याचा रंग आणि आकार पाहून ठरवता येते. जर कलिंगडाची साल पिवळ्या रंगाची असेल आणि त्यावर जाळी किंवा हिरवे पट्टे असतील तर ते आतून नक्कीच गोड असेल. पण जर रंग हिरवा आणि गुळगुळीत दिसत असेल तर त्याची चव हलकी गोड असू शकते. म्हणून, कलिंगड खरेदी करताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या. त्याचप्रमाणे, कलिंगडाचा रंग आणि आकार पाहून, तो गोड आहे की नाही हे ठरवता येते.
फळांचा रंग पाहून ओळखा पिकलेला आहे की नाही
पिकलेले कलिंगड किंवा टरबूज यांचा रंग पूर्णपणे वेगळा दिसतो. पिकलेले कलिंगड वजनाने हलके असते. परंतु रासायनिक प्रकियेचा वापर करून पिकवलेल्या फळांचा रंग पूर्णपणे वेगळा असतो. उन्हाळ्यात फळे खरेदी करताना त्यांचा रंग पाहून तुम्ही ते गोड आहे की नाही सहज ओळखु शकता.
आंबे पिकले आहेत की नाही हे कसे ओळखावे?
पिकलेले व गोड आंबे निवडण्याची सर्वात सोपी पद्धत गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. तर पिकलेला आंबा ओळखण्यासाठी तुम्हाला आंबा हातात घेऊन वास घ्या. नैसर्गिकरित्या पिकलेले आंब्यांचा सुगंध खूप येतो. जर आंब्याचा खालचा भाग काळा किंवा गडद रंगाचा असेल किंवा त्याची साल कोरडी नसेल तर ते पिकलेले नाही. असे आंबे दिसायला सुंदर असले तरी ते अजिबात गोड नसतात.
द्राक्षे पिकली आहेत की नाही हे कसे ओळखावे?
द्राक्षांचा रंग पाहून तुम्ही ते गोड आहेत की नाही हे देखील ओळखु शकता. जर द्राक्षांचा रंग हलका हिरवा आणि पिवळा असेल तर तो गोड असण्याची शक्यता जास्त असते. दुसरीकडे, गडद रंगाची द्राक्षे बहुतेकदा आंबट असतात. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कोणत्याही फळाचा रंग पिकल्यानंतर बदलतो. एवढेच नाही तर त्यांची चवही बदलते.
लिची गोड आहे की नाही हे कसे ओळखावे?
ताज्या आणि गोड लिचीचा रंग गुलाबी किंवा लाल असतो. दुसरीकडे, जर लिचीचा रंग फिकट दिसत असेल तर ती चवीला पूर्णपणे गोड नसतात. कधीकधी लिची गोड आहे की नाही हे तिच्या आकारावरही अवलंबून असते. लिची पिकली आहे की नाही हे तुम्ही स्पर्श करूनही ओळखु शकता. जर लिची स्पर्शाला सैल आणि आतून मऊ असेल तर ती ताजी आणि गोड असू शकते. ताज्या लिचींना थोडासा सुगंध असतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)