भारतीय जनता पक्षातील दोन नेत्यांमधील मतभेद पुन्हा समोर आले आहे. भाजप नेत्या आणि पर्यटन मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या मतदार संघात सोमवारी सभा घेतली. या सभेत आपले आष्टीवर विशेष लक्ष असणार असल्याचे सांगितले. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर आष्टीतील भाजप आमदार सुरेश धस यांनी पलटवार केला आहे. तुम्ही तुमचा मतदार संघ सांभाळा, आष्टीकडे लक्ष देण्यास आपण समर्थ आहोत, तसेच निवडणुकीत काय म्हणाल्या होत्या? त्याची आठवणही सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना करुन दिली.
काय म्हणाले सुरेश धस
आष्टीवर आपले विशेष लक्ष असणार आहे, या पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना आमदार सुरेश धस म्हणाले, आष्टीवर त्यांनी गेल्या निवडणुकीत खूप प्रेम केले होते. आजच्या कार्यक्रमातही त्यांचे ज्याच्यावर प्रेम असतील ते लोकच त्या ठिकाणी आले असतील. या कार्यक्रमात शिट्टीवाले, घड्याळ्यावाले हजर असतील. एकवेळा तुम्ही कॅमेरा उपस्थित लोकांवर फिरवा. आष्टीतील भाजपच्या कार्यकर्त्यांवर आणि भाजपच्या लोकांवर प्रेम करण्यास मी समर्थ आहे. त्यांनी त्यांच्यावर प्रेम करु नये, अशी माझी विनंती आहे.
सुरेश धस पुढे म्हणाले, पंकजा ताईंनी यांनी मुळ मतदार संघावर जास्त लक्ष द्यावे. तिकडे सर्व हायजॅक झाला आहे. निवडणुकीत पंकजाताई यांनी आपला केवळे केज हा एकाच मतदार संघ असल्याचे म्हटले होते. मग आता आष्टी हा कसा तुमचा मतदार संघ झाला? पंकजा मुंडे यांनी जास्तीत जास्त लक्ष त्यांच्या केजमधील राखेवर द्यावे, वाळूवर द्यावे, त्यांच्या मतदार संघात गायरान जमीनी हडप केल्या गेल्या आहेत, तिकडे द्यावे. आमच्या मतदार संघावर लक्ष देऊ नये, असे सुरेश धस यांनी त्यांना सुनावले.
भारताच्या या जातीच्या गाईने तोडले जगातील सर्व विक्रम, 40 कोटींमध्ये विक्री, गिनीज बुकात नोंद

भारत 1, ब्राझील 2…,अमेरिका अन् चीन जवळपाससुद्धा नाही, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा अहवाल

बहिणीच्या लग्नात 22 वर्षीय युवतीचा 3 मिनिटे जबरदस्त डान्स, नंतर स्टेजवर ह्रदयविकाराचा झटका, व्हिडिओ आला समोर

50 हजारांचे एक कोटी करणारा हा शेअर, 10 वर्षांत 22,100 टक्के रिटर्न, कधी किंमत होती 2 रुपये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर आमदार सुरेश धस यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, राज ठाकरे यांचे बोलण लोकांना अपील होत असते. त्यामुळे त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात जी भूमिका मांडली होती, त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री गेले असतील.