अकोला : अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मुर्तीजापुरचे माजी आमदार प्रा.तुकाराम बिडकर यांचे काल वाहन अपघातात निधन झाले. ते सध्या अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार झाले. तुकाराम बिरकड विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना एकीकडे उजाळा दिला जात असतानाच त्यांच्या अपघाताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
राष्ट्रवादीचे मुर्तीजापूरचे माजी आमदार प्रा.तुकाराम बिडकर यांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्यानंतर या अपघाताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जनावरे घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रकने बिडकर यांच्या #viralvideo #akolaaccident #exmlatukarambidkar #ncp #murtijapurexmla @AmhiDombivlikar pic.twitter.com/4tzPUYtt0U
— Atul B. Kamble (@atulkamble123) February 14, 2025
तुकाराम बिडकर यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, शिवसेनेचे माजी आमदार दाळु गुरुजी इतर आजी-माजी आमदार यांनी रुग्णालयात गेले होते. आमदार अमोल मिटकरी यांच्यासह माजी आमदारांनी आपल्या भावन व्यक्त केल्या आहेत. बिडकर यांच्या निधनाने एका पिढीचे नुकसान झाल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
असा घडला अपघात?
भारतीय जनता पक्षाच्या अमरावती विभागातील कार्यकर्त्यांची बैठक अकोला शहरातील सिटी स्पोर्ट्स क्लब येथे होती. या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हजर होते. माजी आमदार तुकाराम बिडकर हे चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी सिटी स्पोर्ट्स क्लब येथे गेले होते. भेटीनंतर दुचाकीवरून परतत असताना जनावरे वाहून नेणाऱ्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत तुकाराम बिडकर यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी राजदत्त मानकर गंभीर जखमी झाले, या दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला.