आणि गर्दीपासून दूर काही दिवस शांततेत आणि साधेपणात घालवायचे असतील तर. तर कदाचित तुम्हाला हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सपेक्षा मातीपासून बनवलेले भारतीय होमस्टे जास्त आवडतील. मातीच्या भिंती, लाकडी खिडक्या, मोकळे अंगण आणि सभोवताली हिरवळ असलेले हे होमस्टे केवळ थंड हवा आणि ताजे वातावरणच देत नाहीत तर तुम्हाला गावाकडील राहणीमान यांच्या सौंदर्याची ओळख करून देतात. आजकाल, इको-टुरिझमचा ट्रेंड वाढत असल्याने, लोक अशा मुक्कामाच्या शोधात आहेत जिथे ते निसर्गाच्या जवळ राहू शकतील, स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेऊ शकतील आणि कोणत्याही लक्झरीशिवाय खरी शांतता मिळवू शकतील.
मातीपासून बनवलेले हे होमस्टे केवळ पर्यावरणासाठी चांगले नाहीत, तर त्यामध्ये राहण्याचा अनुभव देखील खूप खास आहे, जणू काही तुम्ही तुमच्याच गावी सुट्टी घालवत आहात. आज या लेखात आम्ही तुम्हाला देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात असलेल्या 10 सुंदर मातीच्या होमस्टेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही जाऊन गावाकडील निसर्ग, साधेपणा आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.
1. अफसाना होमस्टे मनाली, हिमाचल प्रदेश
मनालीच्या डोंगरामध्ये वसलेले अफसाना होमस्टे हे माती आणि लाकडापासून बनलेले एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे. सफरचंदाच्या बागांमध्ये बसून चहा पिणे आणि पारंपारिक तेथील पदार्थ खाणे हा एक वेगळाच अनुभव तुम्हाला घेता येईल.
https://www.instagram.com/p/C7GpV_qSDQv/?utm_source=ig_embed&ig_rid=1d0005a3-fb19-4626-9ace-b1f9cfab5ab1
2. नंदा स्टोन जिलिंग, उत्तराखंड
उत्तराखंडमधील जिलिंग गावात असलेले हे होमस्टे जुन्या टेकडी स्थापत्यकलेचे जिवंत उदाहरण आहे. दगड आणि मातीपासून बनवलेले हे घर हिमालयाजवळ शांततापूर्ण वेळ घालवण्यासाठी परिपूर्ण आहे.
3. मडहाउस मरायूर, केरळ
केरळमधील मरायूर गावात असलेले ‘द मडहाऊस’ येथे मातीचे घर आहे. हे पर्यावरणपूरक वास्तव्य तुम्हाला केरळच्या ग्रामीण संस्कृती आणि नैसर्गिक वातावरणात राहण्याची उत्तम संधी देते. इथे आल्यावर तुम्हाला संपूर्ण गावाच आहे की काय अस वाटेल त्यासोबत तुम्ही येथे शांततेत क्षण घालवता येतील.
4. कुंदन होमस्टे कुल्लू, हिमाचल प्रदेश
कुंदन होमस्टे हे पारंपारिक डोंगरवस्ती असलेल्या पद्धतीचा वापर करून मातीचे घर बनवलेले आहे, त्यामुळे ही घर थंड हवामानातही उबदारपणा प्रदान करते. हे ठिकाण विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांना स्थानिक संस्कृती आणि गावाकडील घराचा अनुभव हवा आहे.
5. ग्रीनारा कालिकत, केरळ
कालिकत जवळ स्थित हे मातीने बनवलेले होमस्टे शेतांनी आणि हिरवळीने वेढलेले आहे. येथे तुम्हाला सेंद्रिय अन्नपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच येथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाणे आणि पूर्णपणे गावाकडील वातावरण मिळते. येथे येऊन तुम्ही केवळ शांततेचे क्षण घालवू शकत नाही तर स्थानिक जेवणाचा आस्वादही घेऊ शकता.
6. होडाका रण स्टे गुजरात
कच्छच्या रणात वसलेले हे होमस्टे पारंपारिक भुंगा शैलीमध्ये माती आणि शेण वापरून बांधले आहे. येथील स्थानिक कलाकृती आणि गुजराती खाद्यपदार्थ या मुक्कामाला खास बनवतात. तुम्हीही एकदा इथेच भेट द्या.
7. बाणासुरा हिल रिसॉर्ट वायनाड, केरळ
आशियातील सर्वात मोठ्या मातीपासून तयार केलेले रिसॉर्टपैकी एक म्हणून गणले जाणारे हे रिसॉर्ट वायनाडच्या हिरवळीत वसलेले आहे. येथे विलासिता आणि निसर्गाचा एक अनोखा मिलाफ आहे, जो प्रत्येक कोपऱ्यात दिसून येतो. इथे आल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच अनुभूती येईल.
8. काशी विलास कसौली, हिमाचल प्रदेश
माती आणि लाकडापासून बनवलेले हे छोटेसे होमस्टे कसौलीच्या शांत खोऱ्यात वसलेले आहे. जर तुम्हाला निसर्गाच्या जवळ जायचे असेल तर तुम्हाला हा मुक्काम खूप आवडेल. येथे, जेव्हा सूर्याची पहिली किरणे भिंतींवर पडतात तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे असते.
९. मातीर घर गुवाहाटी, आसाम
मातीर घर म्हणजेच मातीचे घर आसामच्या पारंपारिक संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. हे घर केवळ दिसायलाच सुंदर नाही तर त्याच्या थंड भिंती उन्हाळ्यात खूप आराम देतात. निसर्ग, सौंदर्य आणि शांततेचे क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण परिपूर्ण आहे.
10. मेदिनी होमस्टे काझीरंगा, आसाम
काझीरंगा जवळ बांधलेला हा पर्यावरणपूरक होमस्टे माती आणि बांबूपासून बनलेला आहे. राष्ट्रीय उद्यान देखील येथून जवळ आहे, त्यामुळे तुम्ही जंगल सफारीचा आनंद देखील घेऊ शकता. तुम्ही येथे निसर्गाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.