जेव्हा तुम्ही एकमेकांवर प्रेम करता तेव्हा एकमेकांबद्दल कधी कधी आसूया, ईर्षा आणि द्वेष निर्माण होतोच. पण थोडा विचार केला. समजूतीनं पाहिलं तर या परिस्थितीतून मार्ग काढता येतो. त्यामुळे प्रेमसंबंधात ईर्ष्या दाबून ठेवणं कधीही योग्यच असतं. नाही तर संबंध बिघडतात. कधी कधी तर संबंध तुटण्याचीही वेळ येते. त्यामुळे प्रेम संबंधात ईर्ष्या होण्यापासून कसे वाचाल यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. आम्ही तुम्हाला पाच अशा टिप्स देणार आहोत की त्यामुळे तुमचे आयुष्य बदलू शकते.
पार्टनरवर विश्वास ठेवा
कोणत्याही नात्यात विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा असतो. तुम्ही तुमच्या पार्टनरवर विश्वास ठेवला पाहिजे. तुमचा जोडीदार तुमच्याशी खोटं बोलत असेल तर समजावं तो फक्त स्वत:ला फसवत आहे. विश्वास हा कोणत्याही संबंधाचा पाया असतो. जोडीदाराला कायम संशयी नजरेतून पाहणं हे त्याच्यासाठी अपमानजनक ठरू शकतं. त्यामुळे नात्यात वितुष्ट येऊ शकतं. प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारणं किंवा चर्चा करणं तुमच्या संबंधांना तडा देऊ शकतं. त्यामुळे पार्टनरवर संशय घेणं थांबवा. नात्यात तडा जाऊ देऊ नका.
तुलना करू नका
कधी कधी सर्व प्रॉब्लेम हे आपल्यामुळेच होत असतात. आपण आपल्या जोडीदाराची तुलना नेहमी कुणाबरोबर तरी करत असतो. एकदा दोनदा ठिक आहे. वारंवार जोडीदाराची तुलना कुणाबरोबर केली तर त्यामुळे नात्यात मिठाचा खडा पडू शकतो. आपल्या या कृतीने आपल्या जोडीदाराचा अपमान होतोय हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुमचा जोडीदार ही तुमची चॉइस असते. तुम्ही निवडलेली ती व्यक्ती असते. अशावेळी जोडीदाराला त्याच्या गुणदोषासह स्वीकारलं पाहिजे. त्याची तुलना करून त्याला कमी लेखण्यात काही अर्थ नसतो. अशाने नात्यात हेल्दीपणा राहत नाही.
संबंध टिकवून ठेवा
कधीही जोडीदाराला गृहित धरून कोणतीही कृती करू नका. ईर्षेपोटी संबंधाशी खेळ करू नका. जोडीदारासमोर कधीही पूर्वीच्या प्रेयसी किंवा प्रियकराची चर्चा करू नका. त्यांच्या गुणांची तारीफ करू नका. किंवा ऑफिसमधील सहकाऱ्याचीही तारीफ करू नका. तसेच सहलीतील प्रत्येक गोष्ट सांगू नका. जोडीदारासमोर इतर कोणाच्याही गुणांची स्तुती करत राहणं हे भविष्याच्या दृष्टीने कधीच चांगलं ठरू शकत नाही.
स्वातंत्र्य द्या
प्रत्येकवेळी जोडीदाराच्या मागेमागे राहू नका. त्यांना स्वातंत्र्य द्या. मोकळीक द्या. त्यांनाही त्यांची प्रायव्हसी हवी असते. त्यांनाही आपल्या मित्रमैत्रिणीसोबत वेळ घालवण्याची इच्छा असते. अशावेळी तुम्ही त्यांच्यात रोडा बनू नका. पार्टनरला नेहमी त्याला तुमच्या इच्छेनुसार वागवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला त्याला त्याच्या इच्छेनुसार वागू द्यायला पाहिजे. नाही तर त्याचे उलटे परिणाम होऊ शकतात. नात्यात कटूता येण्याची ही सुरुवात असते.
कल्पनाशक्ती वापरा आणि गोंधळ दूर करा
एक गोष्ट करा. डोळे बंद करा आणि आराम करा. विचार करा की कोणत्या परिस्थितीने तुम्हाला ईर्ष्या वाटू लागते. तुम्हाला मनात काय दिसत आहे? तुमचा जोडीदार बाहेर कोणाशी फिरत आहे का? किंवा तो दुसऱ्या कोणाशी बोलत आहे, हसत आहे? आता एक लांब श्वास घ्या. आणि तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाची कल्पना करा. स्वतःला शांत आणि शिस्तबद्ध व्यक्ती म्हणून कल्पना करा आणि ज्या परिस्थितीमुळे तुम्हाला ईर्षा वाटते, त्या विषयास पूर्णपणे उदासीन असं धरणं करा. कारण जीवनाच्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला स्वतःच जबाबदारी घ्यावी लागते आणि तुम्हीच त्याला नियंत्रित करू शकता.