दही तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. दहीमध्ये भरपूर प्रमाणात प्रो-बायोटिक आणि प्रोटिन असते ज्यामुळे तुमच्या शरीराला निरोगी राहाण्यास मदत होते. दहीचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. दहीचे सेवन तुमचं पचन सुधारण्यास मदत करते त्यासोबतच तुमच्या हाडांना योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळण्यास मदत होते. दहीमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, लॅक्टिक ॲसिड यांसारखे पोषक घटक असतात, ज्यामुळे त्याला सुपरफूड देखील मानले जाते. हिवाळ्यात अनेकवेळा वारावरणातील गारव्यामुळे दही जमवण्यास त्रास होतो. परंतु काही सोप्या ट्रिक्स वापरुन तुम्ही हिवाळ्यात घट्ट दही जमवू शकता.
दही तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. दहीचे सेवन केल्यास तुमचे आरोग्य देखील निरोगी राहाते. दहीचा वापर तुम्ही फेस क्लींजर म्हणून करू शकता. अनेकवेळा दही फेस पॅकमध्ये मिसळून तुमच्या चेहऱ्याला लावली जाते. सुर्यप्रकाशामुळे तुमची त्वचा टॅन होते. तुमच्या चेहऱ्यावरील टॅन घालवण्यासाठी मुलतानी मातीच्या फेस पॅकमध्ये दही मिक्स करून तुमच्या चेहऱ्याला लावा यामुळे तुमची त्वचा अधिक मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते. दहीतुमच्या त्वचेला आणि केसांना मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. तुमच्या केसांमध्ये भरपूर प्रमाणात कोंडा झाला असेल तर तुम्ही केसांना दहीचे हेअर मास्त लावू शकता. यामुळे तुमचे केस अधिक चमकदार आणि लांब होण्यास मदत होते.
हिवाळ्यात दही कसे साठवायचे?
मायक्रोवेव्हचा वापर – गॅसवर दूध उकळून ते कोमट होईपर्यंत थंड होऊ द्या. त्यानंतर मल्टी-कूक मायक्रोवेव्ह 200 डिग्री तापमाना 10 मिनिटे प्रीहीट करा. कोमट दुधात दोन चमचे दही घालून चांगले मिक्स करून घ्या. दोन ते तीन तासांनी मायक्रोवेव्हमधून वाटी काढा. तुमची सोप्या पद्धतीनं घरच्या घरी बनवलेली दही तयार
मिरचीचा वापर – कोमट दुधात दोन चमचे दही घालून मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये २ अख्या हिरव्या किंवा लाल मिरच्या मिक्स करा आणि ६ ते ७ तास तुमच्या स्वयंपाकघारामध्ये ठेवा यामुळे तुम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीनं दही बनवू शकता.
निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये विशेष गोष्टींचा समावेश करणं गरजेचे असते. तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात फायबर, प्रोटिन, कार्बोहायड्रेट्स आणि हेल्दी फॅट्सचा समावेश करणे गरजेचे असते. आजकल अनेकांना पोटासंबंधीत अनेक आजार उद्भवतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन करणे. जंक फूडमध्ये भरपूर प्रमाणात फॅट्स असतात ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये चरबी जमा होऊ लागते. जंक फूडचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे तुम्हाला लठ्ठपमा सारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे योग्य आहाराचे सेवन करणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश केल्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहाते.