नाशिक जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सुधाकर बडगुजर यांनी काल मनातील नाराजी, खदखद बोलून दाखवली होती. सोमवारी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकला आलेले, त्यावेळी त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती. पक्षाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचा सुधाकर बडगुजर यांनी काल गौप्यस्फोट केला होता. ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली.
(बातमी अपडेट होत आहे)