अखेर विधान परिषदेला मिळाला नवा सभापती, एकमताने निवड; मुख्यमंत्र्यांनी मानले विरोधकांचेही आभार

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता त्यांचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. देवेंद्र फडणवीसांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. यात ३३ कॅबिनेट मंत्री आणि ३ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर आता अनेक राजकीय गणित बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता भाजप नेते प्रा. राम शिंदे यांना एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

बातमी अपडेट होत आहे….

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)