Chandrahar Patil Joins Eknath Shinde Shiv Sena : गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा रंगली होती. गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडी पाहता चंद्रहार पाटील यांचा शिंदे गटातील प्रवेश सोहळा फक्त एक औपचारिकता म्हणून राहिला होता. शेवटी आता चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ अधिकृतरित्या सोडली असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी मी पक्षवाढीसाठी काम करणार आहे, असे सांगितले.
चंद्रहार पाटील नेमकं काय म्हणाले?
पक्षप्रवेश झाल्यानंतर चंद्रहार पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. माझ्या पक्षप्रवेशासाठी ज्यांनी अट्टहासाने प्रयत्न केले. मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करावे, अशी राम रेपाळे, शरद कणसे काका यांची इच्छा होती. त्यांचे मी आभार मानतो, अशा भावना चंद्रहार पाटलांनी यावेळी पक्षप्रवेशावेळी व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी इतरही बडे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.