chhagan bhujbal upset: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा रविवारपासून सुरु होती. अखेर सोमवारी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. ते म्हणाले, होय मी नाराज आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय? मंत्रिपद किती वेळा आले आणि किती वेळा गेले भुजबळ संपले कधी संपले नाही? असे वक्तव्य करत त्यांनी पक्षातील बड्या नेत्यांना आपली ताकद दाखवण्याचे संकेत दिले.
छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुरु झाली. त्यानंतर भुजबळ मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमात आले नाही. सोमवारी सकाळी भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांचे निकटवर्तीय असलेले प्रमोद हिंदूराव यांना पक्षाने त्यांना भेटण्यासाठी पाठवले. त्या भेटीनंतर भुजबळ यांची नाराजी दूर झाली नाही. दुपारी माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी वैतागून आपण नाराज असल्याचे मान्य केले. होय मी नाराज आहे, असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.