बावनकुळेंनंतर आता फडणवीसांचं मुख्यमंत्रिपदावर मोठं विधान; म्हणाले, माझी भूमिका…

Devendra Fadnavis : राज्याच्या राजकारणात नेहमीच काहीतरी घडत असतं. भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. ते आगामी 2034 सालापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार आहेत, असं त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलंय. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिलीय. ते माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.

बावनकुळे यांच्या हातात असले तर…

“बावनकुळे यांच्या हातात असले तर ते आगामी 100 वर्षे मलाच मुख्यमंत्री म्हणून ठेवतील. पण त्यांच्या शुभेच्छांचा आपण मतीतार्थ समजून घ्यावा. त्यांनी माझ्या चांगल्यासाठीच मला या शुभेच्छा दिल्या आहेत,” असा अर्थ त्यांनी बावनकुळे यांच्या विधानाचा लावला.

माझी भूमिका जेव्हा बदलायची…

बाकी राजकारणात भूमिका बदलत असतात. या भूमिका बदललल्याही पाहिजेत. कोणीही फार दीर्घकाळ कोणत्याही पदावर राहात नाही. त्यामुळे माझी भूमिका जेव्हा बदलायची तेव्हा बदलेल, असं सांगत भविष्यात माझी भूमिका बदलू शकते अन्यथा काहीही होऊ शकतं असे संकेत दिले.

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले होते?

चंद्रशेखर बावनकुळे हे एका सभेत बोलत होते. या सभेत बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्रिपद यावर भाष्य केलं. फडणवीस हे आगामी 2034 सालापर्यंत मुख्यमंत्रिपदावर कायम राहणार आहेत. फडणवीस यांचा विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी असल्याशिवाय विकसित महाराष्ट्राचा संकलप पूर्ण होऊ शकत नाही. देवेंत्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वात आपल्याला पुढे जायचे आहे, असं बावनकुळे म्हणाले होते.

एकनाथ शिंदेंची एका शब्दात प्रतिक्रिया

दरम्यान, बावनकुळे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. बावनकुळे यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. त्यांच्या याच विधानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले. त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. फक्त हात जोडून त्यांनी शुभेच्छा असं म्हटलं.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)