Face Oil Benefits: ग्लोईंग त्वचेसाठी उन्हाळ्यात चेहऱ्यावर ‘या’ तेलाचा वापर ठरेल फायदेशीर…

आपल्या सर्वांनाच सुंदर आणि चमकदार त्वचा पाहिजेल असते. चमकदार त्वचेसाठी आपण पर्लरमध्ये हजारो रूपये घालवतो. मार्केटमध्ये भरपूर क्रिम्स देखील उप्लब्द आहेत ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते. बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजेल. उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. तुमच्या त्वचेची योग्यरित्या काळजी नाही घेतल्यामुळे त्वचा खराब आणि ड्राय होऊ शकते. उन्हाळ्यामध्ये तुमची त्वचा निस्तेज दिसू लागते. वातावरणामध्ये जास्त प्रमाणात उष्णता वाढल्यामुळे घाम येतो ज्यामुळे चेहऱ्यावरील तेज कमी होण्यास मदत होते.

उन्हाळ्यात तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही विशेष उपाय करू शकता. त्यासोबतच तुमच्या त्वचेला आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात पाण्याचे सेवन करणे गरजेचे असते. उन्हाळ्यात तुमच्या आहारामध्ये ज्यूसचा समावेश केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. फळांच्या आणि भाज्यांच्या ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन, फायबर आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदे होतात. चला तर जाणून घेऊया आहारासोबत तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी.

उन्हाळ्याचे दिवस येण्यापूर्वी, तुमची त्वचा काळजी घेण्याची दिनचर्या बदला जेणेकरून या ऋतूतही तुमची त्वचा मऊ राहील. दिवसभर तुम्ही तुमच्या त्वचेवर कोणत्या गोष्टी लावू शकता, ज्यामुळे त्वचेचे सूर्याच्या नुकसानापासून संरक्षण होईल. चेहऱ्यावरील पिगमेंटेशन आणि टॅनिंग टाळण्यासाठी, निरोगी आहारासोबतच योग्य त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्वचेमध्ये हायड्रेशन राखल्याने त्वचा मऊ देखील होईल.

सनस्क्रिन – उन्हाळ्यात घराबाहेर पडल्यावर सूर्यप्रकाश थेट चेहऱ्याच्या संपर्कामध्ये येतो आणि सूर्याच्या किरणांमुळे त्वचेला गंभीर नुकसान होऊ शकते. सूर्यप्रकाश थेट तुमच्या चेहऱ्यावर पडल्यामुळे टॅनिंगच्या समस्या होऊ शकतात. त्वचेची टॅनिंग कमी करण्यासाठी तुम्ही दर 2-3 तासानी चेहऱ्यावर एसपीएफ-30 किंवा त्याहून अधिक पावर असलेल्या सनस्क्रिनचा वापर करू शकता. योग्य सनस्क्रिनचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होते. सनस्क्रिनचा चेहऱ्यावर वापर केल्यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण होते.

खोबरेल तेल – खोबरेल तेलाचा तुमच्या चेहऱ्यावर वापर केल्यामुळे तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिकरित्या हायड्रेट करण्यास मदत करते. उन्हाळ्यात त्वचा सतत धुतल्यामुळे चेहरा कोरडा आणि ड्राय होण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर खोबरेल तालाचा मसाज केल्यामुळे त्वचा चमकदार आणि मॉईश्चरायझ होण्यास मदत होते. खोबरेल तर तुमच्या चेहरा चमकदार होण्यास मदत करते.

कोरफड जेल – उन्हाळ्यात, कोरफडीचे जेल त्वचेला थंडावा आणि ओलावा प्रदान करते. जर तुमच्या त्वचेवर उन्हाची जळजळ होत असेल किंवा जळजळ होत असेल तर अ‍ॅलोवेरा जेल लावा. हे त्वचेला ताजेपणा आणि चमक देण्यास देखील मदत करते. तुम्ही ते ताज्या कोरफडीच्या पानांपासून काढून थेट वापरू शकता.

व्हिटॅमिन सी सीरम – व्हिटॅमिन सी त्वचेसाठी एक उत्कृष्ट अँटिऑक्सिडेंट आहे, ज्यामुळे त्वचेवरील टॅनिंग आणि काळे डाग कमी होतात. व्हिटॅमिन सी सीरम त्वचेमध्ये कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचेची लवचिकता सुधारते.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)