Evening Top 10 Headlines: मिर्जापूरमध्ये १३ जणांचा मृत्यू, राज्यभरातील मुलींच्या वस्तीगृहांना अहिल्यादेवींचे नाव आणि एक्झिट पोलची सर्वांना उत्सुकता

१)अखेरच्या टप्प्यातील मतदानाच्या आधी धक्कादायक बातमी; निवडणूक ड्यूटीवर असलेल्या १३ जणांचा मृत्यू

Mirzapur Polling Workers Death: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी उद्या १ जून रोजी मतदान होणार आहे. या मतदानाच्या आधी उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर येथे १३ निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर बातमी

२)अहिल्याबाई नव्हे आता अहिल्यादेवी, मुख्यमंत्र्यांची चौंडीत मोठी घोषणा; सरकारी दस्तऐवजात होणार सुधारणा

Ahilyadevi Holkar: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. यापुढे सर्व सरकारी दस्तावेजांमध्ये अहिल्याबाई ऐवजी अहिल्यादेवी असा उल्लेख केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वाचा सविस्तर बातमी

३) …तर हसन मुश्रीफांच्या पायावर डोकंं ठेवून माफी मागेन, कल्याणीनगर अपघातप्रकरणी रवींद्र धंगेकरांचं मोठं वक्तव्य

Ravindra Dhangekar on Pune Accident: पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी रवींद्र धंगेकरांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजय तावरेला भर चौकात फाशी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.वाचा सविस्तर बातमी

४) लोकसभा निवडणूक २०२४च्या एक्झिट पोलचे अंदाज कधी आणि कुठे पाहता येतील, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

Lok Sabha Exit Polls 2024 Result: लोकसभा निवडणुकीचा निकाल आता काही दिवसांवर आला आहे. पण त्याआधी अखेरच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलची सर्वांना उत्सुकता लागली आहे. वाचा सविस्तर बातमी

५)मुस्लिम आणि मराठा मतदारांमुळे प्रणिती शिंदे निवडून येतील, नरसय्या आडम यांनी व्यक्त केला विश्वास

Solapur Loksabha Election: सोलापुरात प्रणिती शिंदे निवडून येतील असा विश्वास नरसय्या आडम यांनी व्यक्त केला आहे. तसेच एमआयएमने लोकसभा निवडणुकीत अप्रत्यक्षपणे भाजपचे काम केले असल्याचे वक्तव्य देखील त्यांनी केले आहे. वाचा सविस्तर बातमी

६) राजकारण कधीही थांबू शकतं, मात्र शिवराज्याभिषेक सोहळा कधीही थांबू शकत नाही, संभाजीराजे छत्रपतींचं वक्तव्य

Sambhaji Raje Chhatrapati News: कोल्हापुरात शिवराज्याभिषेक सोहळ्यावर संभाजीराजे छत्रपतींनी वक्तव्य केले आहे. तसेच कशी असेल राज्याभिषेकाची सोहळ्याची रुपरेषा? वाचा सविस्तर… वाचा सविस्तर बातमी

७) पुणे पोर्श अपघातानंतर पालकांची चिंता वाढली; मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी डिटेक्टिव्हची मदत, कसं काम करणार?

Pune Porsche Car Accident: पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्श कार अपघातानंतर आता पालकांची चिंता वाढली असून अनेक पालकांकडून आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी डिटेक्टिव्हची मदत घेतली जात आहे. जाणून घ्या डिटेक्टिव्ह कसं काम करणार? वाचा सविस्तर बातमी

८) घटस्फोटानंतर संपत्तीचे विभाजन कसे होते? पत्नी केव्हा दाखल करु शकते पतीच्या मालमत्तेवर दावा

Division of Property after Divorce: आजच्या आधुनिक काळात घटस्फोट सामान्य बाब बनली आहे, परंतु स्त्री आणि पुरुष दोघांचेही घटस्फोटाशी निगडीत अनेक आर्थिक अधिकार आहेत. घटस्फोटानंतर पत्नीला पतीच्या संपत्तीत अधिकार सांगता येतो का? घटस्फोटाबाबत महिलांच्या हक्कांवर अनेकदा चर्चा केली जाते, परंतु पुरुषाला कोणते अधिकार मिळतात आणि पती-पत्नीमध्ये मालमत्ता कशी विभागली जाते हे तुम्हाला माहिती आहे का?वाचा सविस्तर बातमी

९) नाही येत इंग्रजी, विषय संपला! कानमध्ये मराठी बोलण्यावर छाया कदम यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या- ते लोक फ्रेंचमध्ये…

Chhaya Kadam In Cannes Film Festival: अभिनेत्री छाया कदम या कान फिल्म फेस्टिवलमध्ये जाऊन आल्या. तिथेही त्यांनी आपल्या मातृभाषेचा मान राखला. वाचा सविस्तर बातमी

१०) ट्रॉफी पाहताच रोहित शर्माने दिली भन्नाट प्रतिक्रिया, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं म्हणाला तरी काय…

Rohit Sharma : वर्ल्ड कपपूर्वी रोहित शर्माची खास मुलाखत झाली. यावेळी रोहित शर्माने जेव्हा ट्रॉफी पाहिली तेव्हा त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. रोहितचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. वाचा सविस्तर बातमी