१) जेव्हा शरद पवार नाना पाटेकरांना फोन करतात
लोकसभा निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्षांच्या मला ऑफर होत्या. परंतु राजकारण हा माझा प्रांत नसल्याने त्या क्षेत्रात मी गेलो नाही. माझ्या निवडणूक लढविण्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर मला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोन आला होता, असा किस्सा प्रतिभावान अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितला. वाचा सविस्तर बातमी
२) राज्यघटनेसमोर असा खेळ टिकत नाही
आमची ताकद संविधानाची आहे, तुमची अत्याचाराची आहे. संविधानाने दिलेल्या ताकदीने आम्ही मांड्या थोपटतो. त्यामुळे संविधानबाह्य आरक्षणाची मागणी करून सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या मनोज जरांगे यांचे येणाऱ्या काळात काहीच चालू देणार नाही, अशा शब्दांत आणि दंड आणि मांड्या थोपटत अॅड. गुणवर्ते सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना आव्हान दिले. वाचा सविस्तर बातमी
३)मनोज जरांगे यांनी सरकार पाडण्याचा दिला इशारा
‘मराठा’ आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चालला आहे. मनोज जरांगे यांनी सगेसोयरेची व्याख्या आणि कुणबी नोंदणी प्रमाणपत्र यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला 13 जुलैपर्यंतचा कालावधी दिला आहे. मनोज जरांगे आज (25 जून) रोजी आंतरवाली सराटीमधून कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.या प्रसंगी 13 जुलै पर्यंत जर काही निर्णय झाला नाहीतर राज्यात मोठा धमाका होईल असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. वाचा सविस्तर बातमी
४) जय भीम, जय मीम, जय फिलिस्तीन…
१८ व्या लोकसभेत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सुरू आहे. यादरम्यान एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांची शपथ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बिस्मिल्ला पठण करून त्यांनी शपथेची सुरूवात केली. अखेरीस जय फिलिस्तीन म्हणन त्यांनी शपथेचा शेवट केला. यावरून काही मिनिटांतच भाजप खासदारांनी आक्रमक पवित्रा घेऊन लोकसभेत गदारोळ सुरू केला आहे. वाचा सविस्तर बातमी
५) पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट
पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. जामिनानंतर पुणे पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेणे बेकायदेशील असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहातून तात्काळ मुक्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. अल्पवयीन मुलाची आत्या पुजा जैन यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने मान्य केली. कोर्टाने मुलाला अत्याच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. वाचा सविस्तर बातमी
६) क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेडं कोल्हापूर
कोल्हापुरकरांचं फुटबॉलवरचं प्रेम म्हणजे जगनिराळं आहे. मेस्सी, रोनाल्डो, नेमार या खेळाडूंचे लाखो चाहते कोल्हापुरात आहेत. अशाच चाहत्यांच्या एका ग्रुपने जगविख्यात अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीचा ३७ वा वाढदिवस दणक्यात साजरा केला आहे. कोल्हापुरातील ‘मेस्सी वेडे कोल्हापुरी’ ग्रुपच्या वतीने हा वाढदिवस साजरा करण्यात आला असून या वाढदिवसाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. वाचा सविस्तर बातमी
७) अरविंद केजरीवाल यांना धक्का
कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने मंजूर केलेला जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाचा सविस्तर बातमी
८) रघुराम राजन यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट गुंतवणुकीचे व्हिडिओ
सोशल मीडिया जितका वापरासाठी फायदेशीर आहे तितकाच त्याचा वापर चुकीच्या कारणांसाठीही केला जात आहे. आजच्या काळात सोशल मीडियावर अनेक फसवणूक आणि लोकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने व्हिडिओ पोस्ट केले जात आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा असाच छोटा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांना उद्धृत करून गुंतवणुकीच्या सल्ल्याबद्दल प्रसारित केल्या जाणाऱ्या बनावट व्हिडीओमध्ये खोट्या दाव्यांविरुद्ध इशारा दिला. वाचा सविस्तर बातमी
९) अफगाणिस्तान संघाच्या विजयावर सचिन तेंडुलकर म्हणाला…
जागतिक क्रिकेटमधील दिग्गज संघांना धक्का देत अफगाणिस्तानच्या संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. अफगाण संघाच्या या यशामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. फक्त अफगाणिस्तान नाही तर इतर देशातील क्रिकेट चाहते देखील त्यांच्या या आनंदात सहभागी झाले आहेत. वाचा सविस्तर बातमी
१०) १९ वर्षांपूर्वी आलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’मध्ये झालीये मोठी चूक; आतापर्यंत कोणालाच कशी दिसली नाही?
‘नवरा माझा नवसाचा’मधील एका चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका इन्स्टाग्राम युजरने चित्रपटातील ही चूक दाखवून दिली. वाचा सविस्तर बातमी