पिंपरी-चिंचवड : विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या, दि. 23 नोव्हेंवर 2024 रोजी हाती येतील. तत्पूर्वीच, भोसरी विधानसभा मतदार संघातील आमदार महेश लांडगे समर्थकांनी विजयोत्सव साजरा करायला सुरूवात केली. ठिकठिकाणी आमदार झाल्याबद्दल, हॅट्रिक केल्याबद्दल अभिनंदनाचे फ्लेक्स झळकले आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघात निकालापूर्वीच आमदार महेश लांडगे यांच्या विजयाचे फलक त्यांच्या समर्थकांनी लावले आहेत. निवडणुकीचा निकाल उद्या शनिवार (दि.२३) रोजी लागणार आहे. त्यापूर्वीच चांगभलं प्रतिष्ठाने अध्यक्ष आणि आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक सागर थोरात यांनी फ्लेक्स लावले आहेत.
असून त्यापूर्वीच भोसरी परिसरातील साने चौक, थरमॅक्स चौक, कृष्णानगर, नेवाळेवस्ती, घरकूल या भागात त्यांचे समर्थक सागर थोरात यांनी फ्लेक्स लावले आहेत. तसेच, किर्ती मारुती जाधव यांनीही फलकबाजी केली असून याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महेश लांडगे विरुद्ध महाविकास अजित गव्हाणे असा सामना रंगला आहे. महायुतीकडून महेश लांडगे यांची उमेदवारी निश्चित होती. दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात आलेले अजित गव्हाणे यांनीही विधानसभा निवडणुकीसाठी मोठी ताकद लावली. दोन्ही उमेदवारांनी भोसरी विधानसभा मतदारसंघ प्रचार करत असताना चांगलाच पिंजून काढत चांगलीच रंगत निर्माण केली आहे.
महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांच्यासाठी शरद पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांनी ताकद लावली होती. तर महायुतीचे महेश लांडगे यांच्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली सभा ऐतिहासिक ठरली. या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी मोठी ताकद लावली आहे. परंतु, निकालाआधीच उत्साही कार्यकर्त्यांनी महेश लांडगे यांचे आमदार म्हणून फ्लेक्स लावल्याने चर्चा सुरू झाली आहे.