चंद्रशेखर बावनकुळेImage Credit source: TV9 Marathi
राज्यातील निवडणुका पार पडल्या असल्या तरी राजकीय पक्षांमधील फोडाफोडीचे राजकारण अद्यापही सुरूच असून अनेकांचे विविध पक्षांमध्ये आऊटगोईंग – इनकमिंग सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना एक महत्वाचा कानमंत्र दिला आहे. तुम्ही काँग्रेस (Congress) पार्टी खाली करून टाका. काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा राजकीय फायदा आहे. माझं काय होईल याची काळजी अजिबात करू नका, देवेंद्रजी आहेत, मी आहे, आम्ही न्याय देणार असे सांगत काँग्रेस फोडा, रिकामी करा असे आदेश बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना दिले. आहेत. पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे. काँग्रेसची लोकं आपल्याकडे आली तरी आधी तुमचा विचार करणार, असे आश्वासनही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
मात्र बावनकुळे यांचे हे वक्तव्य काँग्रेस नेत्यांना चांगलंच झोंबलं असून त्यावर वर्षा गायकवाड यांनी टीका केली आहे. काँग्रेस संपवण्याची गोष्ट त्यांनी करू नये, हा लोकांचा पक्ष आहे, लोक विचारधारेने जमला आहे. लोकांची काँग्रेसप्रती श्रद्धा, निष्ठा आहे आणि आम्ही विचारधारेशी प्रामाणिक आहोत. असे बोलणारे खूप आले, आधी स्वत:चा पक्ष सांभाळा असे म्हणत गायकवाड यांनी बावनकुळेंवर हल्ला चढवला.
ही बातमी अपडेट होत आहे.