विमान हवेत उडत असताना प्रवाशाचा बसल्या जागी मृत्यू, इंडिगो फ्लाईटचे इमर्जन्सी लँडींग

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरातील चिखलठाणा विमानतळावर धक्कादायक घटना घडली आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या एका विमानाची इमर्जन्सी लँडींग करावी लागली आहे. एका ८९ वर्षीय वृद्धेची तब्येत अचानक बिघडल्याने या विमानाची इमर्जन्सी लँडींग करण्याची वेळ ओढविली. या महिलेला विमानतळावर डॉक्टरांनी तपासले तर तिचा मृत्यू विमानातच झाला असल्याचे उघडकीस आहे.

मुंबई ते वाराणसी जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटमध्ये उत्तर प्रदेशातील मिर्झापूरात राहणाऱ्या सुशीला देवी नावाच्या महिलेने मुंबईतून आपला प्रवास सुरु केला होता. परंतू उड्डाणा दरम्यान या वृद्ध महिलेला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर क्रु मेंबर्सनी पायलटच्या निदर्शनास ही गोष्ट आणली. त्यानंतर या विमानाला छत्रपती संभाजीनगारातील चिखलठाणा विमानतळावर उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या विमानाचे इमर्जन्सी लँडींग सुखरुप झाले. परंतू या महिलेला उतरविल्यानंतर डॉक्टरांनी तपासले असता तिचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.

विमानात डॉक्टर होता की नव्हता

विमानतळावरील डॉक्टरांच्या पथकाने या महिलेला तपासून मृत घोषीत केले. या घटनेनंतर विमानात प्रवाशांमध्ये आणीबाणी निर्माण झाली. विमानात कोणी डॉक्टर होता की नाही याविषयीची माहीती कळू शकलेली नाही. या महिलेला हृदय विकाराचा झटका आला असावा, त्यामुळे त्यातच तिचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे. या महिलेला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुण मुलीला वर्गात भाषण करीत असताना हृदय विकाराचा झटका आल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती.  त्यामुळे वाढत्या ताण तणावामुळे आता अशा प्रकारच्या मृत्यूच्या घटना वाढत असल्याचे म्हटले जात आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)