ऑपरेशन टायगर सक्सेसफुल? उद्धव ठाकरेंचा पहिला खासदार फुटणार? एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का!

मोठी बातमी समोर येत आहे. धाराशिवमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रविवारी धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी बोलताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना ठाकरे गटातील काही नेते शिवसेनेत येऊ शकतात  असे संकेत दिले होते. यावेळी बोलताना त्यांनी ऑपरेशन टायगरचा देखील उल्लेख केला होता. पुढे पुढे बघा  काय होतंय, धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असं सूचक वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं, तसेच  ओमराजे निंबाळकर हे महायुतीचेच आहेत असंही त्यांनी म्हटलं होतं. सरनाईक यांच्या या दाव्यानंतर आता ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेत प्रवेश करणार का? अशी चर्चा सुरू झाली होती.

मात्र त्यानंतर प्रतिक्रिया देताना  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतापराव सरनाईक यांचा दावा फेटाळून लावला. आपण कधीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र याचदरम्यान आता ओमराजे निंबाळकर यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्या पोस्टमधून शिवसेना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो गायब आहेत. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करून देखील चर्चेला उधाण आलं आहे.

काय आहे नेमकी पोस्ट?  

खासदार ओमराजे निंबाळकर यांची एक पोस्ट सध्या समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये  ते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना दिसत आहेत. मात्र या पोस्टमधून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो गायब आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मात्र रविवारीच ओमराजे निंबाळकर यांनी प्रताप सरनाईक यांचा दावा खोडून काढत आपण उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे ओमराजे हे शिवसेनेत जाणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. ओमराजे शिवसेनेत गेल्यास हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का असणार आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)