पुण्यातील रस्त्यावर लघुशंका करत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचा माफी मागतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मी चुकलो, मला एक संधी द्या, असं म्हणत गौरव आहुजा माफी मागताना दिसत आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यात कायदा सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पुण्यात सकाळच्या वेळेला BMW कारमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका तरुणाने रस्त्यावरच अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. येरवडा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. या तरुणाने रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या महिलांसोर अश्लिल चाळे केले. यानंतर त्या तरुणाने सिग्नलवर लघुशंका केली.
या गाडीत बसलेला हा तरुण मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत होता. येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात स्त्रियांच्या समोर त्याने अश्लील चाळे केले. हे दोघेही तरुण दारु प्यालेले होते. अश्लील चाळे करुन झाल्यावर दोघे फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेले. या कारचा नंबर MH-12 RF8419 आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गौरवला पोलिसांनी ताब्यात घेतलं
गौरव आहुजा असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. या प्रकरणामुळे शहरात वातावरण चांगलंच तापलं आहे. पुण्यात नंगानाच करणाऱ्या या तरुणाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओत तो या प्रकरणी माफी मागताना दिसत आहे.
“मी गौरव आहुजा, राहणार पुणे, काल माझ्याकडून जे कृत्य झालं होतं, ते खूप चुकीचं होतं. मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता, पोलीस प्रशासन आणि शिंदे साहेबांची माफी मागतो. मला माफ करा आणि मला एक संधी द्या. सॉरी”, असे गौरव आहुजाने म्हटले आहे.
गौरवचे वडील काय म्हणाले?
पुण्यात नंगानाच करणाऱ्या या तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. गौरव आहुजा याचे वडील मनोज आहुजा यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला. ‘गैरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते, त्याने सिग्नलवर लघुशंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असं मनोज अहुजा यांनी म्हटलं आहे.