मुंबई : लोकसभेच्या मुंबईतील सहा जागांसाठी सोमवारी, २० मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे मुंबई पूर्व अर्थात वडाळा आरटीओने शिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स) आणि पक्क्या अनुज्ञप्तीसाठी या दिवसाऐवजी नवी तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी येणाऱ्या वाहनचालकांची चाचणी २२ मे रोजी, तर पक्क्या अनुज्ञप्तीसाठीची चाचणी २१ ते २४ मेच्या दरम्यान होणार आहे.
परिवहन विभागाच्या https://parivahan.gov.in संकेतस्थळाद्वारे अनुज्ञप्तीबाबतची सर्व कामे ऑनलाइन करण्यात येत आहेत. या प्रक्रियेनंतर ऑनलाइन वेळ घेऊन चाचणीसाठी कार्यालयात येणे अनिवार्य असते. शहरात २० मे रोजी मतदान आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. त्यामुळे वाहनचालक उमेदवारांना नवी तारीख देण्यात आली आहे. दोन्ही श्रेणींतील उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर तारीख बदलल्याची माहिती संदेशामार्फत देण्यात आली आहे.
मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रतिनिधींनी वाहनचालक उमेदवारांना २० मे रोजी कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना करू नयेत. सुधारित तारखेनुसार संबंधित कागदपत्रांसह उमेदवारांनी चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन वडाळा प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी केले आहे.