ईव्हीएम घोटाळ्यावर शंका आहे का? शरद पवार यांचं सर्वात मोठं विधान काय?

राज्यात अखेर निकाल लागल्यानंतर १२ दिवसांनी महायुतीचे सरकार स्थानापन्न झाले आहे. परंतू या निवडणकीतून काटे की टक्कर होणार असे सर्व एक्झिट पोल आणि जाणकारांनी सांगितले होते, तसे काही घडलेले नाही. त्यामुळे हा निकाल संशयास्पद असल्याचे विरोधकांसह अनेक राजकीय विश्लेषक, कार्यकर्ते आणि नेत्यांचेही म्हणणे आहे. सोलापूरच्या माळशिरस येथील मारकडवाडीत अभिरुप मतदान घेण्याचा प्रयत्न स्थानिक ग्रामस्थांनी करण्याचा प्रयत्न सरकारने उधळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी उद्या मारकडवाडीत जाण्याची घोषणा केलेली आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

शरद पवार म्हणाले की राज्यात महायुतीचा धक्कादायक विजय झालेला आहे.आज मी विधानसभेतून थोडी माहिती घेतली. त्यांचं म्हणणं एकच होतं की लोकसभेच्या निवडणुकीवेळी ईव्हीएमची तक्रार नव्हती. मग तुम्ही आता ईव्हीएमची तक्रार का करता? आमचे निरीक्षणानुसार चार निवडणूका झाल्या आहेत. हरियाणात निवडणूका झाल्या तेव्हा आपण तेथे गेलो होतो.तिथेही भाजपाची स्थिती अत्यंत कठीण होते. ते भाजपा अचानक सत्तेत आली. परंचू जम्मू-कश्मीर मध्ये मात्र फारुख अब्दुल्ला आले. कॉंग्रेसला अत्यंत कमी मते मिळाली. महाराष्ट्रात मात्र भाजपला मोठे यश मिळाले असले तरी त्याचवेळी झारखंडमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात. दोन निवडणुकीत एका ठिकाणी तुम्ही जिंकला, दुसऱ्या ठिकाणी आम्ही जिंकलो. त्यामुळे त्यात ईव्हीएमचा काही संबंध नाही? त्यात एकच चित्र दिसलं मोठी राज्य आहे तिथे भाजप आहे. छोटी राज्य आहेत तिथे अन्य पक्ष निवडून आलेले आहेत असेही शरद पवरा यांनी सांगितले.

गावातील लोकांशी बोलणार

आपण उद्या मारकडवाडीत जातोय.गावातील लोकांशी बोलणार आहोत. उत्तम जानकर काय आणि या ठिकाणचे दोन्ही उमेदवार पाहीले. त्यांच्या सभा देखील पाहिल्या आहेत. गेल्या ४० ते ५० वर्षापासून मी सभा करतोय. यांच्या सभा पाहिल्यावर निकाल य लागणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. वातावरण अनुकूल होतं. पण निकाल अनुकूल नाही. पण जोपर्यंत अधिकृत माहिती नाही तोपर्यंत मी त्यावर बोलणार नाही. ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही. मी फक्त आकडेवारी सांगितली आहे असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)