महाराष्ट्रांच्या मुलीत तुम्हाला तुमची मुलगी दिसत नाही का ? मनोज जरांगे यांचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या मुलीची दहावीची परीक्षा झाली नाही म्हणून ते सागर बंगल्यावरुन वर्षावर गेलेले नाहीत. परंतू देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाने गादीवर बसविले आहे. आमच्या हक्काचे आरक्षण तुम्हा आम्हाला देत नाहीत. महाराष्ट्राच्या मुलीत त्यांना त्यांची मुलगी दिसत नाही का असा सवाल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. कराडचे व्हिडीओ पाहातो म्हणून अशोक मोहिते यांच्यावर कोयत्याने वार झाले आहेत.त्याबद्दल विचारता जरांगे यांनी हे थांबणार नाही.याची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्याची आहे. धनंजय मुंडे यांची टोळी ही कलंक आहे. मुंडे जेलमधील आरोपींशी संपर्कात आहेत का असा संशय आहे. एवढी संपत्ती सापडलीय तर यांच्या ईडीची कारवाई व्हायला हवी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

जो पकडला गेला त्याच्यावर 302 दाखल आहे का? नेमकी काय अडचण आहे. त्याला नुसत्या डोक्यात मुंग्या आल्यात तर दवाखान्यात ठेवले, मग महादेव मुंडेला का नाही ठेवले ? तो मृत्युशी झुंज देत होता असा सवाल देखील जरांगे पाटील यांनी केला आहे. त्या जातीची एक पत होती मात्र आता मान खाली घालून जगावं लागत आहे. चाटेने मोबाईल धनंजय मुंडे कडे ठेवला आहे, तो नाशिकला ठेवला, फोन लावला तो हा बडा नेता कोण? ज्या गाडीने गेला ती गाडी पोलीस स्टेशनला, मग त्यांना आरोपी का नाही केलं ? धनंजय मुंडे सांगत आहे की लोक त्याच्या सोबतचे आहेत. ती जप्त प्रॉपर्टी त्याची नाही त्यामुळे ईडी चौकशी झाली पाहिजे असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

सर्वांची ईडीची चौकशी करावी

त्या डॉक्टरची देखील चौकशी का केली नाही ? अनेक जण बाहेर आहेत, मग तुम्ही धरले कोणाला? फडणवीस यांना आनंदाची गादी आमच्यामुळे मिळाली आहे. येत्या चार्जशिटमध्ये सर्व गोष्टी येणं अपेक्षित आहे. त्याचे नाव येणं अपेक्षित आहे, कारण तो पुरावा नष्ट करत आहे. हे खंडणी मागणारे हे सर्व चार्जशिटमध्ये आले पाहिजे. या सर्वांची ईडीची चौकशी करावी अशी आपली मागणी असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)