बोर्डाच्या परीक्षेचं टेन्शन घेऊ नका, ‘ही’ चार योगासने करा, फायदे जाणून घ्या

दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा असली की विद्यार्थ्यांना टेन्शन येतंच. हे टेन्शन कमी व्हावं, यासाठी पालकांचेही वेगवेगळे प्रयत्न सुरूच असतात. पण, आज आम्ही यावर एक खास उपाय सांगणार आहोत. त्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. फक्त पुढील चार योगासने जाणून घेऊया.

बोर्डाची परीक्षा हा मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. प्रत्येक मुलाला बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतात. पण या काळात मुलांना खूप ताणही येतो. अशा वेळी मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. परीक्षेदरम्यान मानसिक आणि शारीरिक थकवा टाळण्यासाठी मुलांनी योगा करावा.

10 ते 15 मिनिटे काही आसनांचा सराव केल्याने शरीराला आराम तर मिळतोच पण मनही ताजेतवाने होते. यामुळे अभ्यास आणि परीक्षेत चांगली कामगिरी करता येते.

ताडासन

ताडासन हे एक सोपे आणि प्रभावी आसन आहे. यामुळे शरीराला ताणण्याबरोबरच ऊर्जा मिळते. हे आसन उभे राहून केले जाते. मुलांना ताडासन केल्याने शरीरात लवचिकता तर येतेच, शिवाय मानसिक ताणही कमी होण्यास मदत होते.

कृती

  • दोन्ही पाय जोडून सरळ उभे राहा
  • दोन्ही हात डोक्यावरून वर उचलून बोटे जोडावीत
  • दीर्घ श्वास घेताना संपूर्ण शरीर ताणून उभे रहा
  • 5 ते 10 सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर सामान्य स्थितीत परत या

वृक्षासन

वृक्षासन हे संतुलन आणि मानसिक शांती वाढवणारे एक आसन आहे. परीक्षेच्या काळात मानसिक संतुलन राखण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरू शकते.

कृती

  • सरळ उभे राहा आणि एक पाय गुडघा वाकवून दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा
  • दोन्ही हात जोडून डोक्यावरून वर उचला
  • 5 ते 10 मिनिटे या स्थितीत राहून खोल श्वास घ्या
  • नंतर हळूहळू सामान्य स्थितीत परत जा आणि दुसऱ्या पायाने हीच प्रक्रिया करा

पश्चिमचिमोत्तसन

शरीराला आराम देण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी हे आसन अतिशय प्रभावी आहे. यामुळे शरीराचा मागचा भाग ताणला जातो.

कृती

  • सरळ जमिनीवर बसा, दोन्ही पाय पुढे पसरून
  • दीर्घ श्वास घ्या आणि कंबरेपासून वाकताना पायाची बोटे पकडण्याचा प्रयत्न करा
  • 10-15 सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर सामान्य स्थितीत परत जा

खोल श्वास घेणे

खोल श्वास घेतल्याने मानसिक शांती आणि एकाग्रता वाढते. बोर्डाच्या परीक्षेदरम्यान मुलांना अस्वस्थ आणि तणाव जाणवू शकतो, म्हणून दीर्घ श्वास घेतल्यास त्यांचे मन शांत राहते.

कृती

  • बसा आणि डोळे बंद करा
  • नाकातून दीर्घ श्वास घ्या आणि नंतर तोंडातून हळूहळू श्वास सोडा
  • ही प्रक्रिया 5 ते 10 मिनिटे करा

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)