आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात जेवण बनवताना प्रेशर कुकर खूप उपयोगी वस्तू आहे. कारण कमी वेळात सहज अन्न शिजवणारा कुकर ही स्वयंपाकघरातील सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. प्रेशर कुकरमध्ये जेवण शिजवण्याव्यतिरिक्त हे वाफवण्यासाठी आणि बेकिंगसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यात केकही बेक केले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की कुकरमध्ये स्वयंपाक केल्याने अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. खरं तर, काही अन्नपदार्थ शिजवताना एक फेस बाहेर पडतो जो शरीरात पोहोचतो आणि पचनसंस्था बिघडवतो.
एवढेच नाही तर काही गोष्टी अशा आहेत ज्या प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास त्यांची चव खराब होते आणि त्या शरीरालाही नुकासान पोहोचवतात. प्रेशर कुकरमध्ये काही पदार्थ शिजवल्याने त्यांचे पोषक घटक कमी होतात.
प्रेशर कुकरमध्ये कधीही हे 5 पदार्थ शिजवू नका
हिरव्या पालेभाज्या कुकरमध्ये शिजवू नका
पालक सारख्या हिरव्या पालेभाज्या कधीही कुकरमध्ये शिजवू नयेत कारण हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए सारखे अनेक पोषक घटक असतात. परंतु प्रेशर कुकरमध्ये शिजवल्याने त्यातील आवश्यक पोषक घटक कमी होतात जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
प्रेशर कुकरमध्ये केक बेक करणे टाळा
अनेकांकडे ओव्हन नसल्यास लोकं प्रेशर कुकरमध्ये केक बेक करतात. पण हे करणे पूर्णपणे चुकीचे आहे कारण प्रेशर कुकर हा पदार्थ शिजवण्यासाठी बनवला जातो, बेकिंगसाठी नाही. म्हणून, त्यात केक कधीही बेक करू नये.
प्रेशर कुकरमध्ये दूध उकळवू नका
दूध आणि क्रीम सारखे दुग्धजन्य पदार्थ प्रेशर कुकरमध्ये अजिबात उकळवू नयेत. असे केल्याने त्याची चव खराब होते आणि पोषक तत्वे देखील कमी होतात ज्यामुळे आरोग्याला नुकसान पोहोचते. बाजारात असे अनेक कुकर येत आहेत ज्यात दूध गरम करणे सोपे झाले आहे. पण अशा प्रकारे वापरणे हानिकारक ठरू शकते.
कुकरमध्ये काही पदार्थ तळू नयेत
फ्रेंच फ्राईज, पकोडे यांसारखे तळलेले जाणारे पदार्थ कुकरमध्ये शिजवू नयेत. असे केल्याने त्यांना चांगली चव येत नाही. कारण या गोष्टी कुकरमध्ये खोलवर तळता येत नाहीत. म्हणूनच हे नेहमी पॅनमध्ये शिजवावे.
प्रेशर कुकरमध्ये पास्ता आणि नूडल्स शिजवणे टाळा
पास्ता आणि नूडल्स उकळल्यानंतर मऊ होतात, म्हणून ते कधीही प्रेशर कुकरमध्ये शिजवू नयेत आणि जर ते जास्त शिजवले तर ते मेसी होऊ शकतात. म्हणून, प्रेशर कुकरमध्ये ते शिजवणे टाळावे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)