Hair Spa केल्यानंतर ‘या’ 5 चुका करू नका, केस होतील खराब

मऊ सिल्की केस प्रत्येक व्यक्तीला आवडत असतात. पण वाढत्या प्रदूषणामुळे केस खराब होऊ लागले आहेत. त्यामुळे केसांची काळजी घेताना आपण प्रत्येकजण बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांचा वापर करत असतो. तसेच केसांची चमक वाढवण्यासाठी लोंक विविध उत्पादने आणि उपचारांचा अवलंब करतात. हेअर स्पा देखील यापैकी आहे. हेअर स्पा करून केस खराब होण्यापासून वाचवता येतात. यामुळे केसांची चमकही वाढते. गेल्या काही काळापासून हेअर स्पा करून घेण्याचा ट्रेंडही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. हेअर स्पा केल्यानंतर आपल्या केसांचे आरोग्य आणि चमक वाढवण्यासाठी काही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, हेअर स्पा केल्यानंतर अनेकजण काही चुका करतात, ज्यामुळे केसांना फायदा तर होत नाहीच पण नुकसानही होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया हेअर स्पा केल्यानंतर कोणत्या चुका करू नये.

हेअर स्पा केल्यानंतर लगेच केस धुणे

हेअर स्पा केल्यानंतर लगेच केस धुणे टाळावे. हेअर स्पामधून केसांना जे मसाज आणि पोषण मिळते ते केसांना व्यवस्थित शोषून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे केस लगेच धुतले तर केसांना पोषण मिळत नाही. हेअर स्पा केल्यानंतर किमान ६ते ८ तास केस धुणे टाळा.

गरम पाण्याने केस धुणे

हेअर स्पा केल्यानंतर गरम पाण्याने केस धुतल्यास तुमचे केस खराब होऊ शकतात. गरम पाणी केसांमधील ओलावा काढून टाकते, ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात. अशा परिस्थितीत केस कोमट पाण्यानेच धुवा.

केस ड्रायरचा जास्त वापर

तुम्ही जर हेअर ड्रायरचा जास्त वापर केला तर ते तुमचे केस कोरडे आणि कमकुवत बनवू शकतात. स्पा केल्यानंतर केसांमध्ये ओलावा असतो आणि ड्रायरमधील गरम हवा केसांमधील ओलावा काढून टाकतो. अशावेळी केस धुतल्यानंतर नैसर्गिकरित्या केस सुकवण्याचा प्रयत्न करा.

केस खूप घट्ट बांधणे

हेअर स्पा केल्यानंतर केस खूप घट्ट बांधणे टाळावे. केस घट्ट बांधल्यास केसांच्या मुळांवर दबाव येतो आणि केस तुटण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हेअर स्पा केल्यानंतर केस मोकळे बांधणे चांगले असते.

हेअर प्रॉडक्टचा वापर

हेअर स्पा नंतर जास्त हेअर प्रॉडक्टचा वापर करू नका. या प्रॉडक्टच्या अतिवापराने केस जड होऊ शकतात. याशिवाय केसांमध्ये सिलिकॉन आणि रसायने असलेली उत्पादने वापरल्याने त्यांच्या केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)