तुम्हाला ओव्हरइटींगचे दुष्परिणाम तर माहीती असतीलच..जर योग्य प्रमाणात अन्नग्रहण केले नाही. तर फायद्याऐवजी शरीराला नुकसानचे अधिक होते. आजकाल धावपळीचे जीवन आणि राहणीमान झाल्याने आरोग्यासाठी वेळ द्यायला कोणालाच वेळ मिळत नाहीए…लठ्ठपणाची समस्या तर आता कॉमन झाली आहे. लोक आपल्या कुटुंबियांसमवेत आरामात जेवत देखील नाहीएत…
ऑफीसात लोक अनेक तास बसुन काम करीत आहेत. त्यामुळे लोकांना त्याचे डाएट सांभाळताना अडचणी येत आहेत. जंक फूड आहारी लोक जात आहेत. काही वेळा लोक त्यांच्या कामात इतके बिझी आहेत की न कळत ते जादा भोजन खात आहेत. जास्त जेवणाने आपल्या वजन तर वाढतच जाते. तसेच बल्की लिव्हर,पोट, हृदय, मेंटल हेल्थवर याचा दुष्परीणाम होत आहेत.त्यामुळे ओव्हर इंटींग टाळण्यासाठी काही टीप्स आपण पाहूयात…
जेवणाची वेळ निश्चित करा
जेवणासाठी तुम्हाला एक निश्चित वेळ ठरविणे गरजेचे आहे, त्यामुळे तुमच्या शरीराला माहीती असते की त्याला जेवण कधी मिळणार, तुम्ही दिवसातून दोन वेळा हेव्ही डाएट घ्या आणि तीन वेळा हलका नाश्ता करा..
हळूहळू सावकाश घास चावा
कोणतीही वस्तू किंवा हळूहळू चावून घ्या, त्यामुळे तुमचे पोट भरेल आणि अन्न देखील पचन होईल.या सवयीमुळे जादा जेवण्यापासून वाचतो.
पहल्यांदा कमी जेवण घ्या
अनेक लोक एकाच वेळी प्लेटमध्ये खूप जेवण घेतात. त्यामुळे पोट भरल्यानंतरही आपण ताटातले अन्न संपेपर्यत जादा खातो. यामुळे प्लेटमध्ये कमी जेवण घ्या..जर गरज भासली तर पुन्हा घेता येते.
लक्ष विचलित करणाऱ्या पदार्थांपासून लांब राहा
जर तुम्ही जेवण करताना टीव्ही किंवा मोबाईल पाहात असाल तर आपण जास्त पदार्थांना पोटात ढकलत असता. यामुळे नेहमी शांत मनाने जेवण घ्या.त्यामुळे तुम्ही जेवणाचा स्वाद घेत जास्त न खाता संतुलित आहार घेऊ शकतो.
जेवणाआधी पाणी प्या-जर तुम्हाला सतत काही ना काही खाण्याची इच्छा होत असते. तेव्हा या पासून वाचण्यासाठी तुम्ही पाणी पित राहा. जेव्हा भूक लागेल तेव्हा ग्लासभर पाणी आधी प्या म्हणजे भूक कमी होते. यामुळे वजन देखील कमी होण्यास मदत होते.
हेल्दी नाश्त्याचा पर्याय उत्तर
जर तुम्हास खूपच भूक लागत असेल तर हेल्थी स्नॅक्स जवळ बाळगावा. त्यामुळे भूक लागेल तेव्हा तुमच्या पोटात हेल्दी घटक जातील आणि वजन देखील वाढणार नाही.