मुंबई: बहुप्रतिक्षित अशा धर्मवीर २ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या अनावरण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. तसेच अनेक कलाकारांनीही या अनावरण सोहळ्याला उपस्थिती लावली होती. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. यानंतर या चित्रपटाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केलेले एक वक्तव्य चर्चेत आले आहे.
धर्मवीर २ सिनेमाचा ट्रेलरचे अनावरण अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे हे उपस्थित होते. येत्या ९ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावेळी बोलताना प्रवीण तरडे यांनी तिसऱ्या भागाचेही संकेत दिले आहे. मला वाटत नाही की, भाग दोन झाल्यावर ही गोष्ट संपेल, असं म्हणत त्यांनी तिसऱ्या भागाचे संकेत दिले आहे. यानंतर देवेंद्र फडणविसांनी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनाही सिनेमा काढायचा असल्याचे भावना बोलून दाखवली.या सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये काही वेळ हशा पिकल्याचेही पहायला मिळाले. चित्रपटाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, धर्मवीर २ हा चित्रपट कुठपर्यत गेला आहे हे माहिती नाही. मात्र शिंदे साहेब या चित्रपटात आमची देखील भूमिका असायला हवी होती, असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचे पहायला मिळाले. तसेच यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपट काढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ते म्हणाले की, खरंतर मला देखील एक चित्रपट काढायचा आहे. मात्र माझ्या सिनेमाला अजून वेळ आहे. कारण मी जेव्हा सिनेमा काढेन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील. अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. त्यामुळे योग्य वेळ आल्यावर मी तो सिनेमा काढणार आहे. मात्र आज मला आनंद आहे. कारण धर्मवीर २ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तसेच हा चित्रपट कधी बघायला मिळेल याची उत्सुकता लागली आहे.