मोठी बातमी! करुणा शर्मांच्या त्या कागदपत्रांवर कोर्टाचे शिक्कामोर्तब, धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?

करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचा निकाल न्यायालयानं कायम ठेवला आहे. धनंजय मुंडे यांची याचिका माझगाव सत्र न्यायालयानं फेटाळली आहे. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचा निकाल माझगाव सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आला आहे.

करुणा शर्मा यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे धनंजय मुंडेंची याचिका न्यायालयानं फेटाळली आहे. करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचा निर्णय कोर्टानं कायम ठेवला आहे. करुणा शर्मा यांना दोन लाखांची पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. हा मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

आज झालेल्या सुनावनीदरम्यान धनंजय मुंडेंचं स्वीकृतीपत्र आणि अंतिम इच्छापत्र करुणा शर्मा यांच्याकडून कोर्टात सादर करण्यात आलं. दरम्यान करुणा शर्मा यांनी कोर्टात सादर केलेली कागदपत्रं खोटी असल्याचा दावा धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडून करण्यात आला.दरम्यान करुणा शर्मा यांनी आपला पासपोर्ट आणि रेशनकार्डही कोर्टात सादर केलं.

करुणा शर्मा यांनी कोर्टात धनंजय मुंडेंचे स्वीकृतीपत्र सादर केलं. न्यायालयात जे स्वीकृतीपत्र सादर करण्यात आलं, त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी 9 जानेवारी 1998 मध्ये वैदिक पद्धतीनं लग्न केल्याचा उल्लेख आहे. आई वडिलांच्या दबावाखाली दुसरं लग्न केलं पण करुण शर्मा यांच्यासोबत घटस्फोट घेणार नाही, असा उल्लेख या स्वीकृतीपत्रात आहे. करुणा शर्मा आणि दोन्ही मुलांसोबत राहणार असल्याचा उल्लेख देखील, त्यामध्ये आहे. मात्र हे स्वीकृतीपत्र खोट असल्याचा दावा धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचं अंतिम इच्छापत्र देखील सादर करण्यात आलं आहे. धनंजय मुंडेंच्या अंतिम इच्छापत्रामध्ये करुणा शर्मा यांचा पहिली पत्नी असा उल्लेख करण्यात आला आहे. धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रामध्ये पाच मुलांची नावं देखील आहेत.

दरम्यान माझगाव न्यायालयाच्या या निकालामुळे करुणा शर्मा यांना मोठा दिलासा मिळाला आहे, तर धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे.  करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचा निकाल न्यायालयानं कायम ठेवला आहे. आता या निकालाला धनंजय मुंडे हे उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)