संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. आज सकाळपासूनच धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. सध्या ते सातपुडा निवासस्थानी आहेत. मुंडे यांनी आज सकाळपासून भेटीगाठी घेण्याचं देखील टाळलं आहे.
धनंजय मुंडे हे सध्या त्यांच्या सातपुडा येथील शासकीय निवासस्थानी असल्याचं सांगितलं जात आहे. आज सकाळपासून त्यांची भेट घ्यायला आलेल्या सर्वांना गेटवरच अडवण्यात आलेलं आहे. आज ते कोणाचीच भेट घेणार नसल्याचं सांगितलं जात आहे. तसंच त्यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे.